Aditya Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार नुकतेच फुटले आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आपल्या गटाचं विलीनिकरण केलं, त्यामुळं आता आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांची आणि एकनाथ शिंदे यांची विधानसभेत चांगलाच वाद झाला. यावेळी ठाकरे यांनी शिंदेंना चांगलंच कोंडीत पकडलं. त्यामुळं आता तरी यापुढं आदित्य ठाकरे आक्रमकपणे राजकारण करतील का? असा सवाल केला जात आहे.
एकीकडं आपण पाहात असाल की, मुख्यमंत्री देखील सभागृहात बसून उत्तरं देतात, इतर मंत्री देखील सभागृहात बसून उत्तरं देतात. अनेकदा त्यांची कोंडी होते कारण आम्ही तसे जनतेचे प्रश्न विचारत असतो. पण काहीही झालं तरी ते उत्तर द्यायला तिथे बसलेले असतात. पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती कार्यभार सांभाळता येत नाही, ते एकनाथ शिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि सभागृहात पळायला बघतात. म्हणूनच सगळ्या खात्यांचं वाटप केलं जातं. आज आम्ही यावर आक्षेप घेतला तर अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सांगायला लागले की, २०१९ला २०२० ला असं झालं. पण हे सर्वकाही खोटं आहे, तेव्हा असं काहीही झालं नव्हतं. कुठल्याही मंत्र्यानं अशी पळवाट काढली नव्हती. आमचे जिथं जिथं राज्यमंत्री होते तिथं त्यांनी कधी आम्ही प्रश्नांना उत्तरं दिली. याचं पाहिजे तर रेकॉर्ड काढा.
म्हणून आमची हरकत दोन्ही गोष्टींना आहेत, पहिली हकरत यासाठी की अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत ते बाहेर सगळे खेळ खेळत असतात पैशाचे खेळ खेळत असतात. त्यांनी ही खाती त्यांनी मागून घेतलेली आहेत. या खात्यांबाबत आम्ही जनतेला प्रश्न विचारतो ते आमचे वैयक्तिक प्रश्न नाहीत. दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोलले आहेत चुकीचं बोललं आहेत. ते त्यांनी रेकॉर्डवरुन काढावं उगाच अध्यक्षांच्या खुर्चीत बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करु नयेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना चांगलेच संतापलेले दिसले. ते म्हणाले, मघाशी मी सभागृहात नव्हतो. सभागृहाचं कामकाज तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं आज मी त्यांना सांगू इच्छितो काल त्यांना एक जोर का झटका धीरेसे लगा, त्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना आणखी झटके लागणार आहेत. तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता, त्यामुळं आजवर तुम्ही दिलेले निर्देश आणि विरोधीपक्षाला प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही जो काही वेळ देता, तसा आधी कधी दिला होता. ज्यावेळी एखाद्या राज्यमंत्र्याकडं पुरेसी माहिती नसते तेव्ही मी स्वतः सभागृहात येतो किंवा मुख्यमंत्री स्वतः उत्तरं देतात. म्हणजेच जेव्हा अशी सर्व एकत्रित सर्वांची माहिती देण्याची जबाबदारी आहे. त्यामुळं आता त्यांच्याकडं मुद्दे नाहीत. ते अत्यंत हताश झालेले आहेत, निराश झालेले आहेत. आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. पण आता ते नाहीत नाहीतर मी बोललो असतो. आता ते सभागृहात नाहीत, त्यामुळं त्यांना ज्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत त्यांनी सभागृहात थांबलं पाहिजे. प्रश्न मांडण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे. इथं येऊन काहीतरी बडबड स्टंटबाजी करुन जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा. यावेळी त्यांनी इतर वरिष्ठ आमदारांना उद्देशून म्हटलं की, तुम्ही काय या पोराटोरांच्या नादाला लागता.
अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असं बोलायचा तुम्हाला अधिकार नाही. अध्यक्षांच्या नियमानं सभागृह चालतं त्यामुळं याचं पावित्र्य राखणं महत्वाचं आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना सुनावलं. तसंच जयंत पाटील यांना उद्देशून एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९-२२ सभागृहात काय व्हायचं? उत्तरं द्यायला कोण सांगायचं? ते सभागृहात तरी बसायचे का? त्यामुळं मी सांगतो की थोडसं मागे वळून बघावं, आत्मपरीक्षण करावं आणि आत्मचिंतन करावं. त्यामुळं आदित्य ठाकरेंना जरा समजून सांगा, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
सुरुवातीला आदित्य ठाकरे हे सभागृहात प्रश्न विचारायला उभा राहिले तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं खातं हे एकनाथ शिंदेंकडं असल्यानं आणि ते सभागृहात उपस्थित नसल्यानं ते आक्रमक झाले होते. पण मंत्री उपस्थित नसल्यानं आदित्य ठाकरे यांनी आपल्या आमदारांसह सभात्याग केला आणि ते बाहेर निघून गेले त्यानंतर एकनाथ शिंदे सभागृहात आले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंवर आगपाखड केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.