BMC : मुंबई महापालिकेत ठाकरे सेनेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर गडांतर येणार? मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हं; महापालिकेत नेमकं काय सुरुए?

BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नुकतेच फुटले आहेत, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता मुंबईत विरोधीपक्ष म्हणून ठाकरेंचा आवाज दाबण्याचा देखील प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे.
Supreme Court on BMC Election
Supreme Court on BMC Electionsarkarnama
Published on
Updated on

BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नुकतेच फुटले आहेत, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता मुंबईत विरोधीपक्ष म्हणून ठाकरेंचा आवाज दाबण्याचा देखील प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच ठाकरेंचे मुंबई महापालिकेतील नगरसेवक देखील फुटणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळं ठाकरेंच्या सेनेचं विरोधीक्ष नेतेपदही त्यामुळं धोक्यात येऊ शकतं. पण पालिकेत नेमकी काय कट-कारस्थानं सुरु आहेत? जाणून घेऊयात.

Supreme Court on BMC Election
Shalarth ID Scam: 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात SITच्या तपासात धक्कादायक बाबी उघड! उत्तर महाराष्ट्रात गंभीर प्रकार, शिक्षण उपसंचालकाचा फेटाळला जामीन

मुंबई महापालिकेत ठाकरेंचे ६५ नगरसेवक नुकतेच निवडून आले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. पण शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत निवडणूक लढवली असल्यानं ते आता महायुती म्हणून सत्तेत आहेत. तर ठाकरेंची शिवसेना हा महापालिकेतीलप्रमुख विरोधीपक्ष असून विरोधीपक्षनेतेपद हे ठाकरेंकडं आहे. पण आता ठाकरेंचे ६ खासदार फुटले आणि शिंदेंसोबत गेले त्याचीच पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत करुन ठाकरेंचे मोठ्या प्रमाणावरील नगरसेवक फोडण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याची चर्चा आहे.

Supreme Court on BMC Election
Shalarth ID Scam: 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात SITच्या तपासात धक्कादायक बाबी उघड! उत्तर महाराष्ट्रात गंभीर प्रकार, शिक्षण उपसंचालकाचा फेटाळला जामीन

दरम्यान, खासदारांप्रमाणंच ठाकरेंचे मुंबईतील नगरसेवक फोडून ते शिंदेंच्या सेनेत सामावून घेण्याचं आणि त्यातून महायुतीत आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. याद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेचं विरोधीपक्ष नेतेपद हिसकावून घेऊन मुंबई महापालिकेत निर्विवाद महायुतीची सत्ता कायम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.

साम टीव्हीच्या प्रतिनिधींच्या माहितीनुसार, त्यांनी शिंदे सेनेच्या काही नगरसेवकांशी चर्चा केली तर त्यांनी पक्षाच्या नगरसेवकांचा आकडा वाढू शकतो, हा आकडा तब्बल ३० ते ३५ नगरसेवक वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजेच ठाकरेंच्या ६५ पैकी ३० ते ३५ नगरसेवक फुटू शकतात असा शिंदेंच्या नगरसेवकांना विश्वास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com