Mumbai News : मुंबईतील वरळीमधील झालेल्या हिट अँड रन प्रकरण म्हणजे हा अपघात नसून खूनच आहे. त्यानुसार कारवाई झाली पाहिजे. अशी आमची प्रथम मागणी आहे, असे युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या हिट अँड रन प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी अटक केली आहे.
तसेच त्याला मदत करणाऱ्या 12 जणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) का बोलत नाही? उपमुख्यमंत्र्यांना काय आम्हाला निबंध लिहून द्यावा लागणार आहे का? असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
आरोपी मिहीर शाह हा शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा उपनेता राजेश शाह यांचा मुलगा आहे. अपघातानंतर तो तिथून पसार झाला होता. गेली 60 तास मुंबई पोलिस त्याच्या मागावर होती. शेवटी त्याला ताब्यात घेण्यात मुंबई पोलिसांना यश आले. तसेच मिहीर शाह याला मदत करणाऱ्या 12 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर विरोधक आणखीनच आक्रमक झाले आहेत. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत हा अपघात नसून खून आहे. त्यानुसार गुन्ह्यामध्ये खुनाचे कलम वाढवावे, अशी मागणी होत आहे.
मुंबई पोलिसांनी ज्या 12 जणांना ताब्यात घेतले आहे, त्यात मिहीर याच्या आईचा आणि बहिणीचा देखील समावेश आहे. अपघातानंतर मिहीर याने आपली कार वांद्रे येथील कलानगर येथे सोडून दिली. तेथून त्याने आपल्या वडिलांना फोन लावला. त्यानंतर फोन स्विच ऑफ केला होता.
या 'हिट अँड रन' प्रकरणावर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) भलतेच आक्रमक झाले आहेत. ही अपघाताची केस नसून खुनाची केस आहे. अपघातामधील मयत महिलेला सुरवातीला फरपटत नेले. त्यानंतर चालक बदलला आणि पुन्हा कारने महिलेला उडवले गेले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास खुनाच्या गुन्ह्यानुसारच झाला पाहिजे.
या घटनेमध्ये कुठेतरी हलगर्जीपणा झाल्याचेही दिसते आहे. अपघातानंतर मिहीर हा प्रसार होता. त्याला पसार होण्यामागे नेमकी कोणाची मदत होती. कसला दबाव होता. या सर्व गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत. मिहीर शाह नेमका लपला कुठे होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला का नाही? यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी ही आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबईसह राज्यातील वाहतूक व्यवस्थेवर आदित्य ठाकरे यांनी लक्षवेध गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बरच काही सुनावले. रॉंग साईडने वाहनांचे येण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकार वाढलेत. वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलिस कोठे रस्त्यावर दिसत नाही. याबाबत आम्हाला काही गृहमंत्र्यांना निबंध लिहून द्यावा लागतो की काय, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.