Aaditya Thackeray Slams BJP Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar brother controversy : नार्वेकरांच्या बंधूंचा मुंबईकरांवर नवा टॅक्स बॉम्ब; आदित्य ठाकरेंचा भाजपवर ‘लूटमार’चा थेट आरोप!

Aaditya Thackeray Slams BJP Makarand Narwekar Over Mumbai Congestion Tax Demand : भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईत ‘कंजेश्चन टॅक्स’ आकारणी करण्याची मागणी करणारे पत्र महापालिकेला दिले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai congestion tax proposal : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू, भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईथील वाहनांवर ‘कंजेश्चन टॅक्स’ आकारणी करण्याच्या मागणीचे पत्र मुंबई महापालिकेला दिले आहे.

भाजपच्या या मागणीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला असून, ‘भाजपने मुंबईला लुटण्याचा नवा मार्ग शोधला आहे,’ अशी टीका केली.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "मुंबई देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल जमा करते. मात्र केंद्रातील भाजप सरकारच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणतीही ठोस तरतूद गेल्या अनेक वर्षांत करण्यात आलेली नाही, मुंबईचे उद्योग आणि रोजगार सातत्याने राज्याबाहेर नेले जात असतानाच, आता कष्टकरी मुंबईकरांवर नवीन करांचा बोजा लादण्याचे धाडस भाजपचे लोकप्रतिनिधी करत आहेत."

भाजप (BJP) सरकारच्या काळात रस्ते घोटाळा, सुशोभीकरण घोटाळा यांसारख्या अनेक प्रकरणांवरून प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत, याची आठवण करून देताना, आदित्य ठाकरे यांनी, 'एकीकडे रस्ते आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली घोटाळे करून मुंबई लुटायची आणि दुसरीकडे त्याच मुंबईकरांकडून अजून पैसे उकळण्याची मागणी करायची, हा भाजपचा दुटप्पीपणा आहे,’ असा टोला लगावला.

नार्वेकरांच्या माध्यमातून भाजपची कर खेळी

मकरंद नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू असल्याने त्यांच्या 'कंजेश्चन टॅक्स’च्या पत्राला महत्त्व आले आहे. मात्र हा प्रस्ताव केवळ नार्वेकर यांचा वैयक्तिक विचार आहे की, भाजप या मुंबईविरोधी प्रस्तावाशी अधिकृतपणे सहमत आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

भाजपवर जोरदार टीका

कंत्राटदारांनी रस्त्यांची वाट लावून मुंबईकरांचे घामाचे पैसे उधळले, त्याबद्दल भाजप जनतेला ‘कर परतावा’ देणार का? खासगी बस कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी ‘बेस्ट’च्या ताफ्यात कपात केल्याबद्दल भाजप उत्तर देणार का? मुंबईतील खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे (एक्यूआय) मुंबईकरांच्या आरोग्याचे जे नुकसान होत आहे, त्यासाठी भाजप भरपाई देणार का? असे प्रश्न उपस्थित करून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT