

Chandrapur Mayor Election : चंद्रपूर महापालिकेत महापौरपदाचा तिढा आणखीच वाढला आहे. महापौरपदाच्या जवळ असलेल्या काँग्रेस चौहू बाजूने कोंडी होताना दिसत हे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना 'किंगमेकर'च्या भूमिकेत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत 'ठाकरे बंधूं'च्या युती आणि बिहारमधील निवडणुकीचे कारण देत, काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली होती.
परिणामी, मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे सेनेला विरोधात बसावं लागत आहे. आता चंद्रपूर महापालिकेत, किंगमेकरच्या भूमिकेत असलेली ठाकरेसेना काँग्रेस की, भाजपबरोबर जाणार याकडे लक्ष लागलं आहे. दोन्ही बाजूने प्रस्ताव आहेत. पण भाजपचा प्रस्ताव काँग्रेसपेक्षा सरस असल्याने ठाकरेसेना काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोकर यांनी ठाकरे सेनेच्या भूमिकेबाबत मोठं विधान केलं आहे.
चंद्रपूर महापालिकेत, महापौरपदावर काँग्रेसला (Congress) संधी आहे. परंतु काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात राजकीय वाॅर सुरू आहे. गटबाजी उफाळली आहे. थेट दिल्लीपर्यंत गटबाजीचे धक्के पोहोचले आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी धानोरकर यांच्या बाजूने निर्णय दिला. पण सत्तेचं गणित जुळवणं काँग्रेसला चंद्रपूरमध्ये अवघड होऊन बसलं आहे.
'ठाकरेसेना चंद्रपूरमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत आहे. महापौरपदासाठी (Mayor) ठाकरेसेनेबरोबर चर्चा सुरू आहेत. पक्ष निरीक्षक सुनील केदार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्याबरोबर बैठक देखील झाली आहे. यात ठाकरेसेनेने महापौरपदाची मागणी केली आहे. पण, आम्ही महापौरपद सोडणार नाही, ही भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर यावर निश्चित तोडगा निघेल,' असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांचा हा आशावाद प्रत्यक्षात, उतरण्यासाठी ठाकरेसेनेने बरोबर येणं गरजेचं आहे. परंतु, ठाकरेसेना महापौरपदावर अडून बसली आहे. यामागे मंबई महापालिकेचा निवडणुकीचा इतिहास आहे. तिथं काँग्रेसने ठाकरे बंधूंचा ऐनवेळी हात सोडला होता. परिणामी ठाकरेसेना मुंबईतील सत्तेपासून दूर झाली. आता चंद्रपूरमध्ये ठाकरेसेनेशिवाय सत्ता स्थापन होत नसल्याने तिथल्या महापौरपदावर अडून बसली आहे. हा तिढा सोडवणं काँग्रेसला आता आव्हान ठरू लागलं आहे.
यातच, भाजपने ठाकरेसेनेला सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव देत, सव्वा-सव्वा वर्षे महापौरपदाची आॅफर दिली आहे. परंतु इथं महापौरपद पहिल्यादा भाजप विराजमान होणार असे प्रस्तावात म्हटले आहे. काँग्रेस अन् भाजपच्या या प्रस्तावात ठाकरेसेना कोणाच्या बाजूने झुकते हे पाहाण्याची उत्सुकता आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी सुचवल्याप्रमाणे सुरवातीचे अडीच वर्ष माझा (खासदार प्रतिभा धानोरकर) महापौर तर, उपमहापौर व गटनेता आमदार विजय वडेट्टीवार गटाचा राहील. नंतरच्या अडीच वर्षात आमदार वडेट्टीवार गटाचा महापौर राहील. आणि जे आम्हला सहकार्य करतील, त्यांना स्थायी समिती, याप्रमाणे काँग्रेसचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.
सर्वाधिक संख्याबळ काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे महापौरपद हे काँग्रेस पक्षाकडे राहील, काँग्रेस, मित्रपक्ष आणि ठाकरेसेनेला एकत्र करून गट स्थापन करायचा आणि जे सहकार्य करतील, त्यांना उपमहापौर व स्टँडिंग कमिटी सदस्य देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे. यात आता काही बदल होणार नाही. 32 नागसेवकाचे संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे उद्या चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचा महापौर बसेल, अशा विश्वास प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.