Aishwary Thackeray, grandson of late Shiv Sena chief Balasaheb Thackeray, who was targeted in a cyber fraud involving six unauthorized bank transactions. Sarkarnama
मुंबई

Aaishvary Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची मोठी फसवणूक : मोबाईलवर मेसेज आला अन् थेट परदेशातून...

Aaishvary Thackeray Cyber Fraud : ऐश्वर्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि स्मिता ठाकरे व दिवंगत जयदेव ठाकरे यांचे पुत्र आहेत. ठाकरे कुटुंबाला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे स्थान असले, तरी ऐश्वर्य यांनी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Jagdish Patil

Mumbai News, 03 Nov : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि अभिनेता ऐश्वर्य ठाकरे याची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐश्वर्य यांच्या बँक खात्यातून एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा वेळा अनधिकृत व्यवहार करण्यात आले. या सहा व्यवहारांमधून एकूण १९ हजार ६३८ रुपये १५ पैसे काढण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, हे सर्व व्यवहार परदेशातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी ऐश्वर्य ठाकरे यांच्या तक्रारीवरून मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

ऐश्वर्य ठाकरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते अंधेरी येथे आई स्मिता ठाकरे आणि आजी कुंदा यांच्यासोबत राहतात. ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला. त्यांच्या खात्यातून ३०७ रुपये ८२ पैसे डेबिट झाल्याची माहिती या मेसेजमध्ये होती. त्यानंतर अवघ्या आठ मिनिटांनी आणखी एक मेसेज आला. त्यात खात्यातून १५ हजार ५११ रुपये ९८ पैसे डेबिट झाल्याचा आणखी एक मेसेज आला.

त्यानंतर खात्यातून एकूण सहा अनधिकृत व्यवहार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या सर्व व्यवहारांमधून १९ हजार ६३८ रुपये १५ पैसे डेबिट झाले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हे व्यवहार परदेशातून करण्यात आले आहेत. सायबर गुन्हेगारांनी नेमक्या कोणत्या पद्धतीने खात्यातील पैसे काढले, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत ऐश्वर्य ठाकरे?

ऐश्वर्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि स्मिता ठाकरे व दिवंगत जयदेव ठाकरे यांचे पुत्र आहेत. ठाकरे कुटुंबाला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे स्थान असले, तरी ऐश्वर्य यांनी राजकारणाऐवजी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या 'निशांची' या चित्रपटातून ऐश्वर्य यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT