Gokul Chairman Election : सतेज पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीचा मास्टर प्लॅन; मंत्रिमंडळाच्या बैठकीत आजच 'तो' वटहुकूम निघणार?

Gokul Milk Union Cabinet Decision : न्यायालयाने अध्यक्षपदाची निवड घेण्याचे आदेश दिल्यानंतर समविचारी आघाडीकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीसाठी महायुतीकडून स्थगिती आणण्याचा प्रयत्न झाल्यास समविचारी आघाडीला विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये अशा पद्धतीची याचिका दाखल करण्यात आली आहे.
Gokul Election; devendra fadnavis, Dhananjay Mahadik, satej patil And Hasan Mushrif
Gokul Election; devendra fadnavis, Dhananjay Mahadik, satej patil And Hasan Mushrifsarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 03 Nov : गोकुळ दूध संघाच्या संदर्भात आज कॅबिनेटमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. चार सदस्यांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात निर्णय घेऊन आजच राज्यपालांची स्वाक्षरी घेऊन वटहुकूम जारी करण्याची शक्यता देखील दाट आहे.

दरम्यान, या चार शासकीय सदस्यांमध्ये शौमिका महाडिक, मावळते अध्यक्ष नविद मुश्रीफ किंवा ए. वाय पाटील व अशोक फराकटे यांची नावे निश्चित आहेत. अन्य एका जागेवर कोणाला घ्यायचे याचा निर्णय उद्या ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ठरणार आहे. 'गोकुळ' मध्ये २५ पैकी १३ जागा जिंकून राजर्षी शाहू समविचारी आघाडीने बहुमत मिळवले; पण संघाच्या पोटनियमानुसार आवश्यक तो कोरम पूर्ण करण्यासाठी १४ संचालक 'समविचारी'कडे नाहीत.

विरोधी आघाडीकडे १२ संचालक आहेत, त्यामुळे त्यांचाही अध्यक्ष होऊ शकत नाही. याबाबत सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकेवरील आज लागलेल्या निकालात १० नोव्हेंबरला अध्यक्ष निवडणूक घेण्याचे आदेश झाले. त्यासाठी निवडून आलेल्या २५ संचालकांना आजच नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. त्यानुसार नोटिसाही पोहोचल्या आहेत.

Gokul Election; devendra fadnavis, Dhananjay Mahadik, satej patil And Hasan Mushrif
Gokul Election : मंत्री हसन मुश्रीफ अन् महाडिकांच्या प्रयत्नांना हायकोर्टाचा धक्का : गोकुळमध्ये राज्य सरकारमार्फत बहुमत मिळवण्याचा डाव उधळला

दुसरीकडे महायुतीच्या पातळीवर मात्र कोणत्याही परिस्थितीत 'समविचारी' चा अध्यक्ष आणि पर्यायाने काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची 'गोकुळ'वर सत्ता येणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज (ता. ३) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच 'गोकुळ'मध्ये चार शासकीय सदस्य नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा ठराव करण्यात येईल.

त्यानंतर राज्यपालांच्या आदेशाने त्याचे रूपांतर वटहुकुमातही करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. या चार सदस्यांत कोणाला स्थान द्यायचे याचाही निर्णय झाला आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व शिवसेना शिंदे पक्षाला प्रत्येकी एक, तर चौथे नाव मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून ठरवण्याचे ठरल्याची माहिती आहे.

Gokul Election; devendra fadnavis, Dhananjay Mahadik, satej patil And Hasan Mushrif
Gokul Chairman Election : कोर्टाच्या निर्णयाने सतेज पाटलांना मोठा धक्का : 'गोकुळ' अध्यक्ष निवडीबाबत स्पष्ट आदेश, "25 संचालकांना आजच..."

समविचारी आघाडीकडून सुप्रीम कोर्टात याचिका

दरम्यान, सोमवारी गोकुळ दूध संघाबाबत न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी पुन्हा अध्यक्षपदाची निवड घेण्याचे आदेश दिल्यानंतर समविचारी आघाडीकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीसाठी महायुतीकडून स्थगिती आणण्याचा प्रयत्न झाल्यास समविचारी आघाडीला विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये अशा पद्धतीची याचिका दाखल करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.