BJP Vs Abhijeet Dipke .jpg Sarkarnama
मुंबई

BJP News: दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर घरी पोहोचताच अभिजीत दिपकेंनी आरोपांचा बॉम्ब टाकला; भाजपचंही जोरदार प्रत्युत्तर

Abhijeet Dipke News: दिल्लीतील जंतरमंतरवर एकीकडे आंदोलन तापलं असतानाच दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात येत होतं. यावेळी माझ्या आई-वडिलांनाही घरी जाऊन पाहून घेऊ, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्याचा दावाही दिपके यांनी केला आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचे आपण असल्याची मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

Deepak Kulkarni

Mumbai News: कॉक्रोच जनता पार्टी या डिजिटल चळवळीते संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी देशभरातली नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणानंतर मोठं आंदोलन उभारलं होतं. या आंदोलनाला मोठं यश आलं आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि उर्वरित दोन मागण्याही सरकारकडून मान्य करण्यात आल्या.

यानंतर दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथे परतले आहे. त्यांनी आता आंदोलनादरम्यानचे भाजप प्रवेशाच्या आलेल्या अनेक ऑफर्स, त्यांच्यासह कुटुंबाला गोळ्या घालून जीवे मारण्याच्या धमक्या यांसह अनेक धक्कादायक खुलासे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केले आहेत. यावर आता भाजपकडून जशास तसा पलटवार करण्यात आला आहे.

भाजपकडून सीजेपीच्या अभिजीत दिपके यांनी केलेले सर्वच्या सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाची बाजू मांडली आहे. त्यांनी अभिजीत दीपके यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन असल्याचा पलटवार केला आहे.

केशव उपाध्ये यांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी कोणालाही धमक्या दिल्या जात नाहीत. आंदोलनामुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर दिपके यांच्याकडून भाजपवर विनाकारण आरोप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच भाजपकडून अभिजीत दिपके यांना कोणत्याही अधिकृत ऑफर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर अशा प्रकारचा दावा केला जात असेल, तर त्यासंदर्भातील ठोस पुरावे समोर आणावेत, असं आव्हानही भाजपच्या केशव उपाध्ये यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंना केलं आहे.

सीजेपीच्या दिपकेंचे आरोप काय..?

कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांनी गुरुवारी(ता.30) माध्यमांशी बोलताना अनेक खळबळजनक आरोप भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर केले होते. त्यांच्यावर आंदोलन सुरू असताना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ृ दबाव आणण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

ते म्हणाले. मला अनेक ऑफर्स देण्यात आल्या. भाजपमध्ये सामील व्हा, अन्यथा आंदोलन मागे घ्या, अशा सूचना देण्यात आल्या. याचदरम्यान,आंदोलन सुरू ठेवल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यांच्यासह त्यांच्या आईवडिलांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा गंभीर आरोप दिपके यांनी यावेळी केला. ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेमाची भाषा असल्याचं म्हटलं आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर एकीकडे आंदोलन तापलं असतानाच दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात येत होतं. यावेळी माझ्या आई-वडिलांनाही घरी जाऊन पाहून घेऊ, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्याचा दावाही दिपके यांनी केला आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचे आपण असल्याची मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.तसेच माझ्या वयाच्या तरुणाला धमक्या देणे योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT