

Kolhapur Political News : इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये झालेले 22 कोटीचे टेंडर हा भाजपमधील अंतर्गत वादाचे कारण ठरले आहे. आमदार राहुल आवाडे विरुद्ध माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या गटाचे नगरसेवक यांच्यात टोकाचा संघर्ष बनला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातच दोन गट पडल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. सत्ताधारी गटाच्या प्रमुख नेत्यांचे मात्र या सर्वांवर मौन आहे.
आमदार आणि माजी आमदार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी या दोन गटाच्या वादाला इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधारी गटांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्त यांच्या बदलीसाठी हालचाली वेगवान होताना दिसत आहेत. त्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नगरसेवकांनी भेट घेतली आहे.
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी कचरा उचलण्यासाठी 22 कोटी टेंडर मागील महासभेत ठेवण्यात आले होते. सत्ताधारी भाजपकडून आवाडे गटाच्या नगरसेवकांनी हे टेंडर सभागृहात मांडण्यात आल्यानंतर त्याला हळवणकर आणि विरोधक गटाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला. सत्ताधारी हळवणकर गटानेच विरोध दर्शवल्यानंतर आवाडे व हळवणकर गटाच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे.
सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमधील अंतर्गत असंतोषाला आणि राजकीय वादाला आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर हे जबाबदार नसून याला इचलकरंजीचे आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप माझी उपनगराध्यक्ष उदय बुगड यांनी केला आहे.
अवमानकारक वागणूक देण्यासह आयुक्तांच्या कार्यपद्धतीमुळे नगरसेवकांमध्ये असंतोष आहे. त्यांची हीच वागणूकच आवाडे आणि हळवणकर गटाच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वादाचं कारण आहे. शिवाय शहराच्या विविध विकासकामांच्या प्रश्नांवर आमदार व खासदारांना चुकीची माहिती आयुक्तांकडून होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे.
दरम्यान, आयुक्तांच्या या वर्तणुकीमुळे विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. प्रशासकीय कालावधी व लोकप्रतिनिधी आल्यानंतर आयुक्तांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडून जनहित याचिका दाखल करण्याची तयारी विरोधकांनी सुरु केली आहे. तर विरोधकांना हाताशी धरून काही सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्तांच्या बदलींसाठी प्रयत्न सुरू केल्या असल्याची देखील माहिती समोर येत आहे. मात्र सत्ताधारी दोन गटांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मात्र या दोन गटाचे प्रमुख नेते आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मात्र या प्रकरणावर मौन बाळगले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.