Abhijit bichkule- salman khan
Abhijit bichkule- salman khan  Sarkarnama
मुंबई

सलमानवर भडकला अभिजित बिचकुले; सलमान स्वत:ला भाई समजतो पण...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : बिग बॉसच्या (Big Boss) १५च्या सिझनमधून कॉन्ट्राव्हर्सी किंग अभिजित बिचकुले (abhijit bhichkule) नुकताच बाहेर पडला. अभिजीत बिचुकले वाईल्ड कार्ड एंट्री करत बिग बॉसच्या घरात गेले होता. बिगबॉसच्या घरात असताना त्याला अनेकदा त्यांना अभिनेता सलमान खानकडून (salman khan) ओरडाही खावा लागला. पण बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर कॉन्ट्राव्हर्सी किंग बिचुकलेने सलमान खानविरोधात संताप व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर, काय लायकी आहे सलमानची, सलमान स्वत:ला भाई समजतो पण मी सुद्धा दादा आहे, असे १०० सलमान गल्ली झाडायला उभे करेन, असंही त्यानं म्हटलं आहे. (Abhijit Bichkule lashes out at Salman Khan)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने थेट सलमान खानवर निशाणा साधला आहे. "बिग बॉसच्या घरात मला डॉमिनेट केलं गेलं. सलमानने आतापर्यंत बिगबॉसचे 14 शो चालवले. त्याला वाटतं की तो शो चालवतो, मात्र हा 15 वा शो मी चालवला, त्याने जी भाषा वापरली ती त्याला न शोभणारी आहे. काल वाघ पिंजऱ्यात होता आणि तो हंटर फिरवत होता, आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. हा सलमान खान स्वत: ला काय समजतो? काय लायकी आहे त्याची, हे मी त्याला लवकरच दाखवून देईन." असा शब्दांत अभिजित बिचकुलेने थेट सलमानवर संताप व्यक्त केला आहे. (Bigg Boss News)

“बिगबॉसच्या घरातून मी स्वत:हून बाहेर पडणार होतो, पण त्यावेळी बिग बॉसने विनंती करुन थांबवलं आणि आता त्यांच्या नियमानुसार बाहेर काढलं. याबद्दलच मला काही शंका आहेत. बिगबॉसच्या घरात लोक जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप करत होते. तिथे झालेल्या भांडणात मी शिवी दिली हे जगजाहीर आहे. त्यानंतर मग सलमान खानने माझ्यावर जो राग काढला तो त्याला न शोभणारा आहे. त्याच्याबद्दलच मी मी पत्रकार परिषदेत मांडणार आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

बिग बॉसच्या घरातून तिथून बाहेर पडून मला २४ तासच झाले आहेत. कुटुंबाला भेटण्यासाठी साताऱ्यात आलो आहे. बिग बॉसमध्ये धमाल, राग, लोभ अशा सर्व गोष्टींचा आनंद घेत मी खेळलो. पण तेथील बऱ्याच गोष्टींचा खुलासा मी पत्रकार परिषदेत करणार आहे, असे सांगत अभिजीत बिचुकलेने यावेळी अनेक महत्वाचे सीन कट करण्यात आल्याचा आणि विजयी उमेदवार आधीच ठरवल्याचा आरोपही केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT