Mauris Naronha, Abhishek Ghosalkar Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar Firing : धक्कादायक! अभिषेक घोसाळकरांवर गोळीबारानंतर आरोपी मॉरिसची आत्महत्या; स्वतःवर झाडल्या चार गोळ्या

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Firing News : शिवसेनचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यात आल्या आहेत. त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. हा गोळीबार मॉरिस यांनी केला आहे. यानंतर आरोपी मॉरिसनेही स्वतःवर चार गोळ्या झाडून घेतल्या. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले. दरम्यान, उल्हासनगर येथील गोळीबारानंतर आज पाठोपाठ झालेल्या दोन गोळीबारांच्या या धक्कादायक घटनांमुळे मुंबई पुन्हा हादरली आहे.

घटनेपूर्वी मॉरिस नरोन्हा (Maurish Naronha) आणि माजी नगरसेवक घोसाळकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हस्यविनोद केले होते. विविध प्रकल्पांची माहिती दिली. यानंतर मॉरिस उठून गेले. घोसाळकर उठले असता त्यांच्यावर मॉरिसने अचानकच गोळ्या झाडल्या. पाच राऊंड फायरिंगमधील तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्या. यानंतर आरोप मॉरिसनेही स्वतःवर चार गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

दरम्यान, अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मॉरिस आणि अभिषेक यांच्यात पैशांवरुन वाद होता. त्यानंतर त्यांच्यातील वाद संपुष्टात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ते दहिसरमध्ये भेटून विविध विषयांवर चर्चा करत होते. त्या चर्चेनंतर मॉरिस तेथून उठले आणि निघून गेले. तर अभिषेक घोसाळकर उपस्थितांचा निरोप घेत असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा गोळीबार चर्चेतून आधी उठलेल्या मॉरिसने केला. यानंतर आरोपी मॉरिसेनेही स्वतःवर गोळीबार करत आत्महत्या केली. दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बोरिवलीतील करुणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यातील आमदार गणपत गायकवाड प्रकरणानंतर दहिसरमधील झालेल्या दोन गोळीबारांनी मुंबई हदरली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT