Mumbai News : उल्हासनगर गोळीबार प्रकरणानंतर दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर देखील अज्ञाताने गोळीबार केला आहे. हा हल्ला मॉरीस नावाच्या व्यक्तिने केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यावर आक्रमक होत, ठाकरे गटाकडून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारनामाशी संवाद साधून याबाबत निषेध व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मुंबईतील दहिसर काही वेळापूर्वीच गोळीबार झाला. एका मॉरीस नावाच्या व्यक्तिने घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडून जखमी केले यावर आता तीव्र निषेध विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. राज्यात सध्या कायद्याचा धाक उरलेला नाही, राज्याचे धिंडवडे मिंधे मंत्री काढत आहेत. कोणी ही कोणाला उठून धमक्या देत आहेत आणि महाशक्ती पाठीमागे उभी असल्याने त्यांना धाक देखील उरलेला नाही. हे सगळे घडणारे प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देणारे आहेत, असे अरविंद सावंत म्हणाले.
"पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केली. आमदाराने चक्क पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये ही गोळीबार केली, मात्र तरी देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली केली नाही. आमदाराचा राजीनामा देखील मागितला गेला नाही. दुसरीकडे भाजपचे आमदार बोलतात कोणी आमचं वाकड करू शकत नाही आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. ही अशी भाषा सत्ताधाऱ्यांची आहे. सूडाने पेटल्यामुळे कोणाशी संघर्ष करत आहात, हे कळतचं नाही," अशी तीव्र भूमिका अरविंद सावंत यांनी सरकारनामाशी संवाद साधताना केली आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिले आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या राज्यामध्ये गुंडाराज सुरू आहे आणि असं सुरू असताना या सगळ्यांचा गॅंग लीडर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. उल्हासनगर मध्ये ही घटना घडली त्या घटनेनंतर आता दहिसर मध्ये देखील ही घटना घडली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाला आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले. आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला. काय चाललय या राज्यात? गुंडांचं सरकार बसलंय. एका आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही, ते बदनामच आहे, पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.