praniti shinde, sushilkumar shinde  Sarkarrnama
मुंबई

Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंची काँग्रेसच्या विभागस्तरीय बैठकीला गैरहजेरी; चर्चेला उधाण

Congress News : भिवंडी येथे काँग्रेसची कोकण विभाग जिल्हानिहाय बैठक

Bhagyashree Pradhan

Dombvali News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे भिवंडी कोकण विभाग जिल्हानिहाय बैठक पार पडली. मात्र, या बैठकीस माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची मुलगी प्रणिती शिंदे दोघेही गैरहजर राहिले आहेत. त्या दोघांच्या गैरहजेरीमुळे चर्चेला उधाण आले आहे.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इतकेच नव्हे, तर प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनीदेखील यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, भिवंडी येथे पार पडत असलेल्या कोकण विभाग जिल्हानिहाय बैठकीस सुशीलकुमार शिंदे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती.

दोन दिवसांपूर्वी केले होते भाजपने संपर्क साधल्याचे वक्तव्य...

आठ दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी एक डाव केला होता. त्यात त्यांनी सांगितले की, भाजपने त्यांना दोनदा आपल्या पक्षात सामील होण्यासाठी संपर्क साधला होता. भाजपला राज्यात विस्तार करायचा असून यात सत्ताधारी पक्षाचा समावेश करून घेण्याचे त्यांचे धोरण आहे. विरोधी पक्षांना, विशेषतः काँग्रेसला संपवण्याचा त्यांचा मनसुबा असल्याचा दावा त्यांनी केला होता.

राजकारणाचा दांडगा अनुभव...

राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde) हे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यपालदेखील राहिले आहेत. कॉंग्रेसचे दिग्गज नेते असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच भाजपला होईल, अशी चर्चा आहे. त्यानंतर शिंदे यांनी मी कुठेही जाणार नाही, असे सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे दुसऱ्या कामात व्यस्त..

ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या कोकण विभागीय बैठकीत ते येणार असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र ते गैरहजर दिसत आहेत. यासंदर्भात काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी ते दुसऱ्या कामात व्यस्त असतील. हा दौरा 28 तारखेपर्यंत चालणार आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला जमतेच असे नाही. मात्र, ते पक्षासोबतच आहेत, अशी भावना व्यक्त केली.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT