Dhananjay Mahadik, Hasan Mushrif
Dhananjay Mahadik, Hasan MushrifSarkarnama

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर शिवसेनेचेच! आधी मुश्रीफ अन् आता महाडिकांनी दिले संकेत...

Kolhapur and Hatkanangle Contituency : दोन्ही मतदारसंघांत विद्यमान खासदार शिवसेनेचे आहेत. तरीही भाजप एका जागेसाठी आग्रही...
Published on

Kolhapur News : कोल्हापूर किंवा हातकणंगले, यापैकी एक जागा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होती. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या मेळाव्यात या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहतील, असे स्पष्ट केले होते. त्याला आता राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनीदेखील पुष्टी दिली असून कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील दोन्ही जागा सध्यातरी शिंदे गटाकडे राहतील, हे स्पष्ट झाले आहे. 

कृषी प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकारपरिषदेत महाडिकांनी (Dhananjay Mahadik) याबाबतचे संकेत दिले. देशात एक आणि कोल्हापुरात (kolhapur) वेगळा निकाल, असा इतिहास असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘ही बाब खरी आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत (Election) ते पाहायला मिळाले आहे. पण, यावेळी जे देशात होईल तेच कोल्हापुरात पाहायला मिळेल. एका जागेवर भाजपने (BJP) हक्क सांगितला असला तरी त्याबाबतचा निर्णय हा महायुतीत सहभागी सर्व पक्षांचे नेतेच घेतील, त्यातून कोल्हापूरची जागा भाजपकडे आली आणि मला पक्षाने लढण्यास सांगितले तर मी लढायला तयार आहे.’

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif
Lok Sabha Election 2024 : लोकसभा आढावा बैठकीत सतेज पाटलांचा फोटो गायब; पदाधिकारी संतापले

टीव्ही चॅनेलचा सर्व्हे काय आला, कोणाचा होता याची माहिती मला नाही. पण, काल देशभरात जे वातावरण तयार झाले, त्यावरून तरी जनता भाजपसोबतच असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीतील भाजपचा ‘अब की बार 400 पार’ नारा खरा ठरेल, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणीही काहीही भाकीत करीत असले तरी कालच्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे देशातील वातावरण पाहता जनता विरोधात नव्हे, तर भाजपसोबतच असेल,’ असा विश्‍वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. दरम्यान, जागावाटप निश्‍चित झाले नसले तरी जिल्ह्यातील दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेनेलाच जातील, अशी पुष्टी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यानंतर महाडिक यांनीही केली.

(Edited By – Rajanand More)

R...

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif
Maratha Reservation : मराठा समाजाचे सात दिवसांत सर्वेक्षण, 5 हजार कर्मचारी लागले कामाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com