Abu Azmi
Abu Azmi Sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडीचा चेहरा तर नव हिंदुत्वाचा!

Sampat Devgire

मुंबई : राज्यसभेची निवडणूक सहा दिवसांवर येऊन ठेपली असतानाच आज महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटक असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thakre) पत्र लिहून बाँब टाकला. निधर्मी सरकार म्हणून आम्ही पाठींबा दिला होता. मात्र आमचे कोणतेही प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. या सरकारचा चेहरा नव हिदूत्वाचा आहे, याचे काही उत्तर देणार का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. Abu azmi wrote a letter to CM Uddhav Thakre-sd67

निवडणुकीच्या तोंडावर एक एक आमदार व त्यांचे महत्वाचे असताना दोन आमदार असलेल्या समाजवादी पक्षाने वेगळा राग आळवण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या या पत्रात ते म्हणतात, सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन अडीच वर्षे झालीत. सांप्रदायिक भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी किमान कार्यक्रमाच्या आधारे सर्व जाती, धर्मांना बरोबर घेून चालणारी आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्ष व अन्य निधर्मी पक्षांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता, याचे स्मरण त्यांनी करून दिले.

ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षात किमान समान कार्यक्रमातील कोणतेच विषय मार्गी लागलेले नाहीत. याबाबत मी व माझे सहकारी रइस शेख यांनी विविध पत्र लिहिली, मात्र त्याला काहीही उत्तर मिळाले नाही. मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण, हज समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती व समितीचे गठन, उर्दू अकादमी, मोलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती व कामकाजाला गती देने, वक्फ बोर्डाचे गठन, अल्पसंख्यांक समाजाचा विकास, पॅावरलूम विकास असे अनेक विषय आहेत. त्याबाबत अपेक्षीय कार्यवाही झालेली नाही. याबाबत महाविकास आघाडीने काहीच काम केलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT