Jayant Patil
Jayant Patil  Sarkarnama
मुंबई

Jayant Patil ED Enquiry: कार्यकर्त्यांनो, मुंबईला येऊ नका; जयंत पाटलांचे आवाहन

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. मात्र, माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. (Activists, don't come to Mumbai: Jayant Patil's appeal)

आयएल अॅण्ड एफएस कंपनीतील गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यासंदर्भात जयंत पाटील हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. ईडी कार्यालयात पोचण्यापूर्वी त्यांनी ट्विट करत हे आवाहन केले हेाते.

जयंत पाटील म्हणाले की, ईडीचे (ED) समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये.

या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून, आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, इस्लामपूर शहरात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाद्वारे निषेध करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.

जयंत पाटील खंबीर मनाचे नेते

जयंत पाटील यांनी अत्यंत खंबीर मनाने ईडीच्या चौकशीला समोरे जायला हवे. आपण कोणतीही चूक केलेली नाही. हे राजकीय दबावाचे षडयंत्र आहे.काही गोष्टी आम्ही जेव्हा करत नाही किंवा करू इच्छित नाही. मान्य करत नाही. तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यासारख्यांना गुडघे टेकवायला लावण्याचा प्रयत्न असतो. आम्ही गुडघे टेकले नाही, आम्ही संकटाला सामोरे गेलो. जयंत पाटील हेही अतिशय मजबूत मनाचे आणि स्वाभिमानी नेते आहेत. त्यांनी अगदी व्यवस्थित ताठ मानेने तपास यंत्रणांना समोरे गेले पाहिजे, असा सल्ला शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT