आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. आर्यन खान प्रकरणात वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. पण आता वानखेडेंनी आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे. गँगस्टर आतिक अहमदसारखी माझीही परिस्थिती होईल, असा दावा करत त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
गँगस्टर अतिक अहमदसारखा (Atique Ahmed) माझ्यावर देखील हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मलाही सुरक्षा देण्यात यावी. अशी मागणीच त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. न्यायालयाने वानखेडेंना 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. तसेच, तसेच, २२ मे पर्यंत वानखेडे यांना सीबीआयला आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे.
दरम्यान ऑगस्ट २०२२ मध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच समीर वानखेडे यांना धमकी देण्यात आली होती. वानखेडेंच्या ट्विटरवर ''मेसेजमध्ये "तुमको पता नहीं तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पड़ेगा. तुमको खत्म कर देंगे," असा धमकीवजा मेसेजमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, १५ एप्रिल २०२३ रोजी उत्तर प्रदेशचा माफिया अतिक अहमद (Atique Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली. पोलीस वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी दोन्ही भावांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आपल्याही जिवाला असा धोका असल्याचं सागंत वानखेडेंनी सुरक्षेची मागणी केली आहे.
Edited By- Anurdha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.