Maharashtra Politics: मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली घडली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीनं हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पण या हल्ल्याचा सुत्रधार कोण, हल्ल्याचे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ताडदेवच्या जनता नगर भागातील एका निवासी इमारतीमध्ये 30 ते 40 अज्ञातांनी तलवारी आणि धारधार शस्त्रे घेऊन प्रवेश केला. इमारतीलत राहणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांवर हल्ला केला.पण या हल्ल्याचे कारण अद्याप कळालेलं नाही. या हल्ल्यात तिघांपैकी दोघेजण गंभीर जखमी झालेले आहेत.एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली झाली असून दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई कली. तीन हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात आली. इतरांचा शोध सुरु आहे. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.पण हल्लेखोर कोण होते? हल्ल्या हेतू काय होता, यासंदर्भात ताडदेव पोलीस अधिक तपास करत आहे.
याशिवाय दुसरीकडे ठाण्यातही ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.ठाण्यातील कासारवडवली येथे ठाकरे गटाचा कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. सोमवारी (३ एप्रिल) सायंकाळी ही घटना घडली. सोमवारी (3 एप्रिल) संध्याकाळचा सुमारास शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रोशनी शिंदे त्यांच्या ऑफिसमधून घरी निघाल्या असताना रात्री असताना साडेआठच्या सुमारास शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली. या प्रकरणी रोशनी यांनी पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.