Akola News : छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी,वीर सावरकर अवमान यांसारख्या विविध मुद्द्यांवरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे फडणवीसांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. याचदरम्यान, आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील पाणी प्रश्न पुन्हा तापण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख बाळापूर मतदार संघातील 69 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठीच तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचं पाणी आरक्षण रद्द केल्यानं आक्रमक भूमिका घेतली आहे.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाविषयी माहिती दिली आहे. आमदार देशमुख हे मतदारसंघातील पाणी प्रश्नावरून पुन्हा आंदोलन करणार आहेत. अकोला ते नागपूर अशी पदयात्रा येत्या 10 एप्रिलपासून काढणार आहे. या पदयात्रेची सुरुवात ही अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत ही काढण्यात येणार आहे.
बाळापूर मतदार संघातील 69 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठीचं तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचं पाणी आरक्षण रद्द केल्यानं आमदार देशमुख चांगलेच संतप्त झाले आहे. यापूर्वी त्यांनी अकोला जिल्ह्यातील वान धरणातून होणाऱ्या 69 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्याचा विरोधात विधानभवन परिसरात आंदोलन सुरु केलं होतं. यानंतर विधानसभेत वेगाने चक्र फिरलीत आणि त्यांना आश्वासन देण्यात आले आहे.
देशमुखांचे फडणवीसांवर गंभीर आरोप...
अकोला तालुक्यातील 69 गावांना वान धरणातून हा पाणीपुरवठा होणार होता याकरिता 108 कोटी खर्च करून 70 किलोमीटरची पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आली आहे. या स्थगिती विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असूनही देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठाला स्थगिती दिल्याचा आरोप बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
तसेच भाजपचा केवळ शिवसेनेच्या मतदाससंघातील विकास कामांना विराेध असून, 60 टक्के काम झालेल्या 69 गावे पाणी पुरवठा याेजनेला स्थगिती देत फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केले, अशी टीका आमदार देशमुख यांनी केली.
(Edited by Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.