Sayaji Shinde join NCP Ajit Pawar  sarkarnama
मुंबई

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश! अजितदादांना देणार साथ

Roshan More

Sayaji Shinde News : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अधिक ताकद सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाने ताकद मिळेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांचे पक्षात स्वागत केले.

सामाजिक कामात देखील सयाजी शिंदे हे अग्रेसर आहेत. ज्येष्ठ अभिनेता ते आहेत. मराठी मनापासून असून त्यांनी दाक्षिणात्य सिनेमात त्यांनी झेंडा रोवला, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी सयाजी शिंदेंचे पक्षात स्वागत केले.

मला या पक्षाच्या विचार आवडले. शेतकऱ्यांच्या योजनेसाठी हा पक्ष काम करतोय. लाडकी बहीण योजनेचा निर्णय चांगला आहे. यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. यांच्या सगळ्यांकडून धडे घेईल, असे सयाजी म्हणाले.

सयाजी शिंदेंना मोठी संधी

अजित पवार यांनी आम्ही सयाजी शिंदेंना मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत सयाजी शिंदे हे स्टार प्रचारक असणार आहोत. आधी त्यांच्यावर स्टार प्रचारकाची जबाबदारी. स्टार प्रचारकाला उमेदवार निवडून आणायचे असते. या जबाबदारी नंतर त्यांनी दुसरी संधी देऊ, असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT