Siddharth Shirole : शिवाजीनगरमधील भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा; तो कसा? आमदार शिरोळेंनी सांगितला

BJP MLA Siddharth Shirole told the math of victory in Shivajinagar Assembly Constituency : पुणे शहरातील शिवाजीनगर मतदार संघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना यंदाची विधानसभा निवडणूक सोपी कशी असेल, याचं गणित अगदी सोपं करून सांगितलं.
Sidharth Shirole 3.jpeg
Sidharth Shirole 3.jpegSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात भाजपच्या ताब्यात आहे. परंतु यंदा तिथं निवडणूक अधिकच सोपी आहे, असे भाजपचे तिथले आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दावा केला.

विजयाचा गुलाल कसा घेऊन याचाचं, याची रणनीती देखील सांगितली. तशी ती ठरवली असून, त्यावर अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. मतदार संघात यासाठी अधिकाधिक गुंतून घेतलं आहे, आणि हाच माझ्या विजयाचा मार्ग असेल', असा दावा आमदार शिरोळे यांनी छातीठोकपणे केला आहे.

'सरकारनामा'च्या 'सकाळचा चहा' सदरखाली झालेल्या मुलाखतीत भाजप (BJP) आमदार शिरोळे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. नगरसेवक ते आमदार, असा त्यांचा 13 वर्षांचा राजकीय प्रवास त्यांनी उलगडला. यात त्यांनी शिक्षण, राजकीय वाटचाल, पक्ष संघटन, नागरिकरण, बदलते मतदार, पक्षाचे निर्णय, प्रशासन, राजकीय वारसा, राजकीय आव्हानं, यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

पुण्यातील वाढत्या शहरीकरणामुळे शिवाजीनगर मतदार संघामधील बदलती राजकीय गणितं आणि आव्हानं वेगळी असणार आहे आणि यंदाच्या निवडणुकीला समोरे जाताना ती सोपी नसेल, हे देखील त्यांनी आवर्जुन सांगितलं. पण, मतदार संघात उभारलेलं संघटनात्मक जाळं विजय करून देईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sidharth Shirole 3.jpeg
Mahavikas Aghadi NCP News : जागावाटप झालेले नसताना 'मविआ'तील राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडसाठी मुलाखती घेतल्याने चर्चांना उधाण!

पुण्यातील (Pune) शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने वातावरण निर्मितीच केलेली नाही, तर प्रत्यक्षात ग्राऊंडवर काम केलं आहे. यातून विरोधकांकडून भाजपविरोधात नकारात्मक वातावरण तयार केले, जात आहे. नरेटिव्ह तयार केला जात आहे. त्यातला हा प्रकार आहे. तो जास्त काळ टिकत नसतो. पण हा नरेटिव्ह परतून लावण्याचे काम, प्रत्यक्ष कामातून केलं आहे. त्यामुळे शिवाजीनगर मतदार संघात विजय भाजपचाच होईल आणि ते विजयाचं गणित भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अगदी सोप्यापद्धतीनं उलगडून सांगितलं.

Sidharth Shirole 3.jpeg
Appasaheb Jagdale : हर्षवर्धन पाटलांवर शाब्दिक वार, बंडखोरीचा इशारा; आप्पासाहेब जगदाळेंनी काय म्हटलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com