Aryan khan
Aryan khan Sarkarnama
मुंबई

तीन आठवड्यानंतर जामीन मिळाला अन् आर्थर रोड कारागृहातील आर्यन म्हणाला...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा (Mummun Dhamecha) आणि अरबाझ मर्चंट (Arbaaz Merchant) या तिघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज आर्यनची आर्थर रोड कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यानंतर आर्यननेही आनंद व्यक्त करीत सगळ्यांचे आभार मानले आहेत.

आर्थर रोड कारागृहाती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनला जामीन मंजूर झाल्याची माहिती कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला काल (ता.28) सायंकाळी 6 वाजता दिली. ही बातमी कळताच त्याने आनंद व्यक्त केला. त्याने कारागृहाची कर्मचाऱ्यांचेही आभार मानले. याचबरोबर आर्यनने कारागृहातील वास्तव्याच्या काळात ओळख झालेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे. याचबरोबर त्यांना कायदेशीर मदतही देण्याचे त्याने सांगितले.

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे.

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात आहे. जामिनाचा आदेश आज न्यायालयाकडून मिळणार असून, त्यानंतर त्यांची सुटका होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT