Ashwini Vaishnaw and Narendra Modi
Ashwini Vaishnaw and Narendra ModiSarkarnama

अश्विनी वैष्णव यांच्या रेल्वे मंत्रालयाचा एक निर्णय पडला चांगलाच महागात

रेल्वे मंत्रालयाने घेतलेला एक वादग्रस्त निर्णय आयआरसीटीसी कंपनीला चांगलाच महागात पडला आहे.
Published on

नवी दिल्ली : उच्चविद्याभूषित असलेले अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) हे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची (Railway ministry) धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या हाती कारभार गेल्यानंतर रेल्वे सुधारेल, अशी आशा होती. परंतु, आता विपरीत घडले आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेला एक मोठा निर्णय रेल्वेच्या अखत्यारीतील इंडियन रेल्वे केटरिंगअँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या कंपनीला चांगलाच महागात पडला आहे.

आयआरसीटीसी कंपनीला मिळणाऱ्या शुल्काबाबत रेल्वेने मोठा निर्णय घेतला होता. कंपनीला मिळणाऱ्या शुल्कापैकी निम्मे शुल्क रेल्वे घेणार असल्याचा हा निर्णय होता. यानंतर मुंबई शेअर बाजारात काल आयआरसीटीसीचा शेअर 29 टक्क्यांनी गडगडला. तो 650.10 रुपयांवर आला. आयआरसीटीसी ही कंपनी रेल्वेतील खाद्यपदार्थ, ऑनलाइन तिकिट आणि केंटरिंग सेवेचे व्यवस्थापन करते. यापोटी कंपनीला शुल्क मिळते. रेल्वेच्या निर्णयामुळे आयआरसीटीसीला मोठा फटका बसला आहे.

Ashwini Vaishnaw and Narendra Modi
आर्यनला जामीन मिळाला अन् मुकुल रोहतगी म्हणाले...

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात वैष्णव यांना रेल्वे व माहिती तंत्रज्ञान खाते देण्यात आले होते. त्यावेळी वैष्णव यांचा बायोडाटाही आधी सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यांनी घेतलेल्या पदव्या, उच्च पदांवर केलेले काम याची माहिती त्यामध्ये होती. वैष्णव यांनी इलेक्ट्रानिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली आहे. ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले होते. त्यानंतर कानपूर आयआयटीतून पदव्यूत्तर पदवी तर अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

Ashwini Vaishnaw and Narendra Modi
भाजपचं अखेर ठरलं; उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी त्रिदेव फॉर्म्युला!

वैष्णव हे 1994 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी होते. या परीक्षेत देशपातळीवरील गुणवत्ता यादीत त्यांचा 27 वा क्रमांक होता. त्यानंतर त्यांनी ओडिशातील बालासोर आणि कटक जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून काम केले. 2006 मध्ये ते मोरमुगाओ पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर दोन वर्षे एमबीए पदवीसाठी अमेरिकेला गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com