Kamya Punjabi
Kamya Punjabi File Photo
मुंबई

अभिनेत्रीनं राजकीय इनिंग सुरू केली अन् म्हणाली, आयुष्याची खूप सुंदर सुरवात!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : लोकप्रिय अभिनेत्री (Actress) काम्या पंजाबीने (Kamya Punjabi) काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करून राजकीय इनिंग सुरू केली आहे. या इनिंगबद्दलव खूपच उत्सुक असून, आयुष्यातील सुंदर सुरवात होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काम्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची स्टारपॉवर वाढली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनीच काम्याला पक्षात आणून तरुण मतदारांना पक्षाकडे खेचण्याची खेळी खेळली आहे. राजकीय इनिंगबद्दल काम्या ही खूपच उत्सुक आहे. तिने ट्विटरवर म्हटले आहे की, माझी एक सुंदर सुरवात झाली आहे. भाई जगताप, तहसीन पूनावाला, मुंबई काँग्रेसने केलेल्या स्वागताबद्दल मी त्यांचे आभारी आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याबाबत मी उत्सुक आहे.

काम्या पंजाबी ही बिग बॉस सीझन 7 मधील स्पर्धक होती. ती दूरचित्रवाणीरील मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शक्ती-अस्तित्व के एहसास की या शोचे चित्रीकरण तिने नुकतेच संपवले आहे. ती दोन दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात आहे. बनू मै तेरी दुल्हन, मर्यादा : लेकीन कब तक?, बेइंतहा आदी लोकप्रिय मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. अनेक मुद्द्यांवर ती सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून आवाज उठवत असते.

काम्या पंजाबी यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम काल मुंबईत झाला. या वेळी पक्षाचे नेते तहसीन पूनावाला हेसुद्धा उपस्थित होते. तहसीन पूनावाला यांनी काम्या यांचे पक्षात स्वागत असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काम्या पंजाबी यांनी काँग्रेस परिवारात प्रवेश केला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रियांका गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम्या या जनतेची सेवा करतील. भाई जगताप यांच्यासारखे अध्यक्ष लाभणे हे त्यांच्यासाठी सुदैवाचे आहे.

आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस, प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक सोनिया गांधी यांनी नुकतीच घेतली. त्यासाठी भाई जगताप दिल्लीमध्ये गेले होते. या बैठकीतनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर त्यांनी स्वबळाचे विधान केले होते. त्यावरून अजूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढायची की स्वबळावर यावर एकमत झालेले नाही, असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT