समीर वानखेडेंनी 10 वर्षांपूर्वीच दिला होता शाहरूख खानला दणका!

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाईमुळे समीर वानखेडे चर्चेत आले आहेत.
Sameer Wankhede and Shahrukh Khan
Sameer Wankhede and Shahrukh Khan File Photo

मुंबई : अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्यावरील कारवाईमुळे अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) चर्चेत आले आहेत. या प्रकरणी ते चौकशीच्या फेऱ्यातही अडकले आहेत. याच वानखेडेंनी 10 वर्षांपूर्वी शाहरूख खानला दणका दिला होता. त्याला वानखेडेंनी तब्बल दीड लाखांचा दंडही भरायला लावला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2011 मध्ये शाहरूख खान हा कुटुंबासह परदेशातून आला होता. त्यावेळी समीर वानखेडे हे सीमाशुल्क विभागात सहाय्यक आयुक्त होते. वानखेडे यांनी त्याला विमानतळावर अडवले होते. त्याच्याकडे असलेल्या परदेशी वस्तू त्याने जाहीर केलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या वस्तूंवरील सीमाशुल्कही त्याने भरले नव्हते. शाहरूखकडे त्यावेळी 20 बॅगा होत्या.

वानखेडे आणि त्यांच्या पथकाने शाहरूखच्या बॅगांच्या तपासणी केली होती. त्याने सीमाशुल्क चुकवल्याचा त्यांना संशय होता. यामुळे काही तास शाहरुखची चौकशीही करण्यात आली होती. अखेर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांनी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्याआधी सीमाशुल्क चुकवल्याप्रकरणी त्याच्याकडून वानखेडेंनी दीड लाखांचा दंड वसूल केला होता, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Sameer Wankhede and Shahrukh Khan
कॅप्टन अमरिंदरसिंगांनी काढली सिद्धूंची अक्कल

वानखेडे यांनी शाहरुख खानच नव्हे तर अनुष्का शर्मा, बिपाशा बसू, अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, रेखा चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, मिनिषा लांबा आणि मिका सिंग यांना दणका दिला होता. या सेलिब्रेटींनी परदेशातून परतल्यानंतर विमानतळावर त्यांच्याकडील परदेशी वस्तूंची माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे वानखेडे यांनी त्यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याकडून दंडाची वसुली केली होती, असे सूत्रांनी सांगितले.

Sameer Wankhede and Shahrukh Khan
कॅप्टनने आधीही पक्ष काढला होता अन् मिळाली फक्त 856 मते!

वानखेडेंची एनसीबीकडून चौकशी

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि क्रूझ पार्टी प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी एनसीबीचे 5 सदस्यांचे पथक दिल्लीहून आज मुंबईत दाखल झाले आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह 5 अधिकारी आहेत. या पथकाने आज वानखेडे यांचा जबाब नोंदवला आहे. चौकशी पथकासमोर हजर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com