rimi sen sarkarnama
मुंबई

अभिनेत्री रिमी सेनेला चार कोटींचा गंडा ; व्यावसायिकाविरोधात गुन्हा

व्यास मूळचा गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी असून सध्या गोरेगाव येथील नास्को गार्डन परिसरात राहतो.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : तिमाही ३० टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवून एका अभिनेत्रीची सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोरेगाव येथील एका व्यावसायिकाविरोधात खार पोलिसांकडे तक्रार केली आहे.

रिमी सेन (rimi sen)असे या अभिनेत्रीचे नाव असून तिची सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी खार पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.‘धूम’, ‘गोलमाल’, ‘हंगामा’, ‘बागबान’, ‘फिर हेरा फेरी’ सारख्या चित्रपटांमध्ये रिमी सेन (rimi sen)हीने काम केलं आहे. अंधेरी येथील रहिवासी असलेल्या रिमीने शुभमित्र स्वपनकुमार सेन या तिच्या खऱ्या नावाने तक्रार केली आहे.

२०१९ मध्ये अंधेरी येथील व्यायामशाळेत रोनक जतीन व्यास या आरोपी व्यावसायिकाशी तिची ओळख झाली होती. व्यावसायिकाने तिमाही ३० टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवल्यामुळे रिमी सेनने तिच्या चित्रपट निर्मिती कंपनीच्या माध्यमातून चार कोटी १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. नफा किंवा तिने गुंतवलेली मूळ रक्कमही तिला मिळाली नाही. व्यावसायिकाने संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी रिमीने खार पोलीसात तक्रार नोंदवली आहे.

व्यास मूळचा गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी असून सध्या गोरेगाव येथील नास्को गार्डन परिसरात राहतो. व्यासने गुजरातमध्ये त्याची ‘फोमिंगो बेव्हरेज’ नावाची कंपनी आहे. ही कंपनी कमोडिटी व्यवसायात गुंतवणूकीचा व्यवसाय करते, असे सांगितले होते. आरोपी व्यासने रिमी सेनचा विश्वास संपादन करण्यासाठी तिला सुरक्षेची हमी म्हणून साडे तीन कोटी रुपयांचा धनादेश आगाऊ दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

रिमीने फेब्रुवारी, जुलै २०१९ दरम्यान व्यास यांच्या कंपनीच्या बँक खात्यात एकूण एक कोटी रुपये हस्तांतरीत केले. ही रक्कम मिळाल्यानंतर व्यास याने तिला तिच्या गुंतवणुकीवर ४० टक्के परतावा देण्याचे वचन दिले होते. यानंतर तिने ऑक्टोबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान तीन कोटी १४ लाख रुपये रुपये हस्तांतरित केले. अशा प्रकारे तिने एकूण चार कोटी १४ लाख रुपये व्यासच्या व्यवसायात गुंतवले.

त्यानंतर ठरलेल्या अवधीत व्यासने तिला पैसे परत केले नाहीत. तिने पैशांची मागणी केली असता तो विविध कारणे देऊ लागला. मार्च २०२० मध्ये रिमीने व्यास यांच्याकडे तिच्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर, त्याने अभिनेत्रीच्या कंपनीच्या खात्यात तीन लाख रुपये हस्तांतरीत केले.

पैसे परत न मिळाल्याने नाराज झालेल्या अभिनेत्रीने व्यास याने दिलेला चेक बॅकेत टाकला असता. संबधित खाते हे यापूर्वीच बंद केल्याची माहिती समोर आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ४०९ भा.द.वी अंतर्गत व्यास विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT