नागपूर : अनेक कॉग्रेसचे नेत्यांचे वकील असलेले, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके (satish uke)यांच्या घरी ईडीने (ED)आज सकाळी छापा मारला. नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. (ED Raids in Nagpur)
सतिश उके नागपुरातील प्रेस क्लब मध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलं होतं. मात्र सतिष उके यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.
सतीश उके हे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. सतीश उके यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी जमीन गैरव्यवहारप्रकरणी उके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सतीश उके गेल्या अनेक वर्षापासून कॉग्रेस नेत्यांची वकील करीत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने एडवोकेट सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. या कारवाईमागे भाजपचे षडयंत्र असल्याचे बोललं जाते. (ed officials raids on advocate satish uke house at nagpur)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.