train accident in Odisha :
train accident in Odisha :  Sarkarnama
मुंबई

Odisha Train Tragedy : ओडिशा रेल्वे अपघातानंतर गौतम अदानींची मोठी घोषणा ; घेतली 'ही' जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो

Adani Balasore Victim : ओडिशा येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अजूनही अनेक प्रवाशी जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ओडिशा रेल्वे अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी अदानी समूहाने विशेष पुढाकार घेतला आहे.

याबाबत गौतम अदानी यांनी टि्वट करीत ही माहिती दिली. गौतम अदानी यांनी जाहीर केले आहे की, 'ओडिशा रेल्वे अपघातात ज्या निष्पाप लोकांचे पालक गमावले त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार आहे.

"ओडिशा रेल्वे अपघात ही घटना खूप व्यथित करणारी आहे. पीडित आणि त्यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, पीडित मुलांच्या उत्तम भवितव्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे," असे गौतम अदानी यांनी म्हटलं आहे. या अपघातात २७५ जणांना मृत्यू झाला असून एक हजारांच्य पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील तीनशे जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

बालासोर येथील रेल्वे अपघात ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रविवारी रात्री उशिरापासून गाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. दुसरीकडे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव 2 जूनपासून बालासोरच्या बहनगा बाजार स्टेशनवर थांबले होते. मदत व दुरुस्तीचे काम पाहिले.

अपघातानंतर 51 तासांनंतर जेव्हा पहिली ट्रेन रुळावरून रवाना झाली तेव्हा रेल्वेमंत्री हात जोडून उभे असलेले दिसले. यावेळी ते म्हणाले की, आमची जबाबदारी अजून संपलेली नाही. हरवलेल्या लोकांना शोधणे हे आमचे ध्येय आहे. असे म्हणत ते भावूक झाले.

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रविवारी संध्याकाळी बालासोरमध्ये सांगितले की, 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बदलल्यामुळे हा अपघात झाला. याला जबाबदार असणाऱ्यांचीही ओळख पटली आहे. रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंट सदस्य जया वर्मा यांनी दिल्लीत सांगितले की, सुरुवातीला सिग्नलमध्ये बिघाड झाल्याचे दिसते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT