Mumbai News : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांचे वकील निलेश ओझा यांनी आता सुशांतसिंह राजपुत मृत्यूप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर मोठे विधान केले आहे. सालियन आणि सुशांतसिंहच्या मृत्यूचे सुरूवातीपासूनच कनेक्शन जोडले जात होते.
सुशांतसिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीला सीबीआयने क्लिन चीट दिली आहे. त्यावर बोलताना ओझा म्हणाले, सीबीआयने क्लिन चीट दिलेली नाही. पुरावा मिळाला नाही, असे म्हटले आहे. क्लोजर रिपोर्टला कायद्यात महत्व नाही. क्लोजर रिपोर्टनंतरही कोर्ट खूनाच्या तपासाचे आदेश देऊ शकते. आरुषी तलवारच्या केसमध्ये कोर्टाने असा रिपोर्ट फेटाळला होता.
क्लोजर रिपोर्टनंतरही पुन्हा तपास होऊ शकतो, सीबीआय चार्जशीट दाखल करू शकते, कोर्ट अरेस्ट वॉरंट काढू शकते. त्यामुळे याला क्लिन चीट बोलू शकत नाही. क्लोजर रिपोर्ट येतो तेव्हा एक कॉपी फिर्यादीला द्यावी लागते. म्हणजे या प्रकरणात सुशांतसिंह यांच्या वडिलांना द्यावी लागेल. त्यावर त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल, असे ओझा यांनी सांगितले.
रिपोर्टविरोधात सुशांतसिंहचे वडील अपीलही करू शकतात. त्यांच्या अपीलावर कोर्ट आदेश देऊ शकते. आमची मागणी आहे की, कोर्टाच्या नियंत्रणाखाली तपास व्हायला हवा. आरोपींनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना मॅनेज केलेले असू शकते. मी रिपोर्ट पाहिला नाही, पाहिल्यानंतर त्यावर स्पष्टपणे बोलता येईल, असे ओझा यांनी म्हटले आहे.
सीबीआयने 2022 मध्येच स्पष्ट केले होते की, दिशा सालियनच्या प्रकरणात आम्ही कोणताच तपास केला नाही. हा तपास मुंबई पोलिसांकडे आहे. त्यामुळे कुणालाही क्लिन चीट देण्याचा प्रश्नच येत नाही. याचा फायदा आरोपींना होणार नाही, असे सांगत ओझा यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे टेन्शन वाढवले आहे.
एकीकडे गरीब वडील जे मसाला चटणी विकतात आणि दुसरेकडे आदित्य ठाकरे आणि गँग हे पॉवरफुल लोक आहेत. ही धनशक्ती विरुध्द जनशक्तीची लढाई आहे. देवाच्या कृपेने सत्याचाच विजय होईल, असेही ओझा यांनी म्हटले आहे.
25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.