Maharashtra Assembly session update : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरूवारी विधानसभेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि आमदार आदित्य ठाकरे प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी बाकांवरून एका आमदाराने तुम्ही खाली बसा, असे आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हटल्यानंतर जोरदार वाद सुरू झाला. ठाकरेंसह जाधवांनी थेट आव्हानात्मक भाषा करत सत्ताधारी आमदाराला शिंगावर घेतलं.
नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव यांनी राज्यातील अनेक भागात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या चर्चेला सरकारकडून कोण उत्तर देणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांसह मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री अनुपस्थित असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर कुठल्या मंत्र्याने उत्तर द्यावे, असा आग्रह तुम्ही धरू शकत नाही, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. या उत्तराने समाधान न झालेल्या जाधव यांचा आणखी भडका उडाला.
महाराष्ट्रावर आलेल्या संकटाबाबत सरकार जर एवढ्या निर्दयपणे, उद्दामपणे कसेही वागणार असेल तर नुसती भाषण करून चर्चा बंद करू, असा संताप व्यक्त केला. जाधव यांच्या या विधानावर सत्ताधारी बाकांवरील आमदारही आक्रमक झाले. भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले, सरकार संवेदनशीलपणे चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, अशी असंसदीय भाषा योग्य नाही.
भातखळकरांच्या या विधानानंतर आदित्य ठाकरेही बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावर सत्ताधारी बाकांवरून तुम्ही खाली बसा, असा आवाज देण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरेंसह भास्कर जाधव प्रचंड आक्रमक झाले. तुम्ही सांगू नका, तुम्ही राम मंदिर लुटणारे आहात. राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. हिंमत असेल तर या इथे, नीट बोला, वय बघा तुमचं, असे अत्यंत त्वेषाने आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. सत्ताधारी बाकांवरूनही नीटच बोलतोय, असा आवाज येत होता.
भास्कर जाधवही संबंधित आमदारावर तुटून पडले. लय उर्मट आणि घमेंडखोर, नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येकवेळी असा अहंकार, हे ते. ह्यांना बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. ह्यांचा बोलणे, अहंकारी, सगळं बघितलंय मी या माणसाचं. मी म्हणजे सर्वज्ञ. पण तुमच्या मर्यादा, ज्ञान, कुवत लोकांना माहिती आहे. तुमची झेप लोकांना माहिती आहे, असा खरपूस समाचार भास्करा जाधव यांनी घेतला.
वाद सुरू असतानाच सत्ताधारी बाकांवरून कदाचित निष्ठेबाबत भाष्य झाले असावे, त्यामुळे जाधवांनी थेट राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख करत आम्हाला निष्ठा शिकवू नका असे म्हटले. काय केलं होतं, ते राज ठाकरेंनी मुलाखतीत सांगितले होते. त्यांच्याकडे गेला होता, हे राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन करून सांगितले होते. तुम्हाला कुणी पक्षात घेतलं नाही, असा खोचक टोला जाधव यांनी लगावला. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी या चर्चेवर पडदा टाकत मुळ विषयाकडे जाधव यांचे लक्ष वळविले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.