Aditya Thackeray, Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Aditya Thackrey : ...तर कल्याण लोकसभा शिवसेना जिंकणार; ठाकरे गटाचा दावा

Political News : खासदार श्रीकांत शिदेंसमोर आदित्य ठाकरेंचे डिपॉजिट वाचवून दाखविण्याचे शिंदे गटाचे आव्हान

सरकारनामा ब्युरो

Shivsena News : कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येतेय. या चर्चेनंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाकडून आव्हान प्रतिआव्हान सुरू झाले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी जर निवडणूक लढवली तर आम्ही ती जागा शंभर टक्के जिंकू, असा विश्वास व्यक्त केला तर दुसरीकडे शिंदे गटाने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर आदित्य ठाकरेंनी डिपॉजिट वाचवून दाखवावे, असे आव्हान केले आहे.

आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. याबाबत कल्याणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय. उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे जर कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांचं स्वागत आहे त्यांचं अभिनंदन आहे. आम्हाला देखील त्याचा आनंद आहे, आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास शंभर टक्के ही जागा जिंकू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट ठाकरे गटाला आव्हान दिले आहे. मोरे यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आहे. त्या वरळी मतदारसंघात सचिन आहेर, सुनील शिंदे या दोन आमदारांचा बळी घेऊन ते वरळीला आमदार झालेत. कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी शिंदे यांची वेगळी ओळख आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंनी नगरसेवकाच्या जागा निवडून आणाव्यात

आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी कल्याणमध्ये त्यांचे डिपॉझिट वाचवावे इतकं काम खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे ते ठाकरे गटाने सोडावं...त्यांनी साध्या नगरसेवकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात असे त्यांना आमचं आव्हान आहे.

(Edited by Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT