Aditya Thackeray Challenge : 'असेल हिंमत तर वरळीतून लढा, नाहीतर मी ठाण्यातून..' : आदित्य ठाकरेंचे शिंदेंना ओपन चॅलेंज!

Aditya Thackeray Open Challenge to Cm Eknath Shinde : आदेश आला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला उड्या मारत जातात...
Aditya Thackeray Challenge :
Aditya Thackeray Challenge : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. 'हिम्मत असेल तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक लढावी, नाहीतर मी ठाण्यातून लढायला तयार आहे, असा ओपन चॅलेंज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलाय यामुळे आणि पुन्हा एकदा ठाकरे-शिंदे असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. (Latest Marathi News)

Aditya Thackeray Challenge :
Dharashiv Police Latest News : मराठा आंदोलकांची समंजस भूमिका; मात्र पोलिसांकडून दुकाने बंद

आदित्य ठाकरे म्हणाले, "घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी मागील दीड वर्षांपासून सांगतोय, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वरळी मतदारसंघातून लढावं. तसं नसेल तर मी ठाण्यातून त्यांच्याविरोधात लढायला तयार आहे. पण निवडणुकाच होत नाहीत. कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. पुणे आणि चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूक घ्यावी. दुसरीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत, सिनेटच्या निवडणुका होत नाहीत, याला लोकशाही म्हणतो का आपण?"

Aditya Thackeray Challenge :
Nagpur Winter Session : बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; राणेंनी विधानसभेत झळकावला फोटो

"आपल्या राज्यात यांनी लोकशाही मारलेली आहे, संपवलेली आहे. ती पुन्हा जिवित करण्यासाठी आमचा लढा आहे. अनेक लोकार्पण प्रकल्पांची कामे रखडलेली आहे. आजही घटनाबाह्य मुख्यमंत्री आदेश आला म्हणून राजस्थानला गेलेत. मोठेमोठे उद्योगदेखील परराज्यात जात आहेत. मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्री राजस्थानात जातात, प्रचाराला-शपथविधीला जातात. आदेश आला की दिल्लीला उड्या मारत जातात, पण महाराष्ट्रासाठी त्यांना वेळ मिळत नाही," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com