Aditya Thackeray
Aditya Thackeray 
मुंबई

'हा' बंगाल पॅटर्न किंवा महाराष्ट्र पॅटर्न असेल- आदित्य ठाकरे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : “जेवढं हे लोक केंद्रातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, तेवढा महाराष्ट्र एकवटेल आणि महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील,'' असं म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रसरकारला डिवचलं आहे. आज मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी सुरू असलेल्या छापेमारीवर प्रतिक्रिया देताना भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. (Aditya Thackeray latest news)

हे सगळं राजकारणासाठीच सुरु आहे. एका अर्थाने हा भाजपाने प्रचार सुरू केला आहे. फण आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बंगाल पॅटर्न असेल किंवा महाराष्ट्र पॅटर्न असेल, असे प्रकार केंद्रीय यंत्रणांकडून वाढत जातील. निवडणुकीपर्यंत हे सगळं होत राहणार”,असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची सुरूच होती. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने आक्रमक पवित्रा घेतला होता. असे असतानाच यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी, कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. महापालिकेच्या निवडणूकांच्या तोंडावरच शिवसेनेचा सर्वात मोठा नेताच चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे शिवसेनेत काळजीचे वातावरण पसरले आहे.

तर, यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यादेखील दक्षिण मुंबईच्या आमदार आहेत. त्यामुळे यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव शिवसेना पक्षप्रमुखांच्या जवळचे मानले जातात. विधानसभा निवडणुकीच्या वेळी यामिनी जाधव यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरून त्यांचीही चौकशी सुरु झाली आहे. तपास सुरू असल्याने जाधव यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीबाहेर मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT