Aditya Thackeray presenting alleged irregularities in Worli voter list during Shiv Sena’s rally at Worli Dome, highlighting fake voter concerns. Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : मतचोरीच्या आरोपांवर बोलताना CM फडणवीसांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले; म्हणाले, 'आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी...'

Devendra Fadnavis on Aditya Thackeray Presentation : काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित राहुल गांधी यांच्याप्रमाणेच प्रेझेंटेशन देत मतदार याद्यांमध्ये कसा घोळ झालाय हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

Jagdish Patil

Mumbai News, 28 Oct : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईतील वरळी डोम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित केला.

यावेळी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याप्रमाणेच प्रेझेंटेशन देत मतदार याद्यांमध्ये कसा घोळ झालाय हे आदित्य यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी वरळी मतदारसंघातील जवळपास 19 हजार नावं संशयित असल्याचा दावा केला.

त्यांनी या नावांमधील साम्य, लिंग बदल, EPIC नंबर यातील घोळही समोर आणला. तसंच वरळीमध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर 1200 मतदार कमी केल्याचा खळबळजनक दावाही यावेळी आदित्य ठाकरेंनी केला.

आदित्य ठाकरेंच्या कालच्या प्रेझेंटेशनमुळे मतचोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशातच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णायांची माहिती दिली.

यावेळी पत्रकारांनी त्यांनी आदित्य ठाकरेंनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केल्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारलं असता त्यांनी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये, अशी अपेक्षा होती, असा टोला लगावला. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, 'माझी अशी अपेक्षा होती की, आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये. अशी माझी अपेक्षा होती.

मला वाटत नाही ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत आणि मी तसं त्यांना म्हणतही नाही. मात्र, राहुल गांधी यांनी मोठी स्क्रीन लावून इकडून तिकडून फिरतात. खोदा पहाड निकला चुहा असं त्यांचं झालं आहे. अगदी तसंच दुर्दैवाने या ठिकाणी आदित्य यांनी केलं. माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तु्म्ही राहुल गांधी बनू नका.'

शिवाय राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिली आहेत असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. तर आता फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राचे राहुल गांधी बनू नका, असं केलेल्या वक्तव्यावर ठाकरेंची शिवसेना नेमकं काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT