Pune Jain Boarding : गोखले बिल्डर्सची जैन बोर्डिंग व्यवहारातून माघार, तरीही 230 कोटी रुपये बुडणार? धंगेकरांनी 'त्या' करारावर बोट ठेवल्याने नवा ट्विस्ट

Ravindra Dhangekar On Pune Jain Boarding : पुण्यातील जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून माघार घेतली. मात्र आता विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग विश्वस्त मंडळाला एक मेल पाठवला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपण व्यवहार रद्द करत असून आमचे 230 कोटी परत मिळावेत अशी विनंती केली आहे.
Jain Boarding Trust Pune, Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar addressing media over the Jain Boarding Trust controversy in Pune, demanding that ₹230 crore from the land sale be frozen for the welfare of the trust and students.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Oct : पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी, ती बिल्डरला मागे देऊ नये, अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच या ही जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून माघार घेतली. मात्र आता विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग विश्वस्त मंडळाला एक मेल पाठवला आहे.

ज्यामध्ये आपण व्यवहार रद्द करत आहोत तरी आमचे 230 कोटी परत मिळावेत अशी विनंती केली आहे. मात्र, हे पैसे गोखले बिल्डर्सना परत देऊ नये अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधित एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसावा यासाठी त्यांचे 230 कोटी जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरावे असं म्हटलं आहे.

Jain Boarding Trust Pune, Ravindra Dhangekar
BJP Vs Shivsena UBT : अमित शहांना 'अ‍ॅनाकोंडा' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचा 'स्वत:चा पक्ष गिळणारा घरातला अजगर' असा उल्लेख करत भाजपची बोचरी टीका

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरने जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता त्या करारात असे नमूद आहे की, जर बिल्डरच्या बाजूने बॅक आउट झाले तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्ट ला मिळालेली आहे. ती रक्कम गोठविण्यात यावी.

शिवाय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. तसेच अशा प्रकारचे गैर व्यवहार करणाऱ्या संबंधित ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करत शासनाने यावर प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे.

Jain Boarding Trust Pune, Ravindra Dhangekar
Maharashtra Politics : शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेची मुख्यमंत्री फडणवीसांनी लावली चौकशी, स्थानिकच्या निवडणुकांपूर्वी पवार काका-पुतण्यांची कोंडी?

तसंच या पुढील काळात ट्रस्ट चालविण्यासाठी जैन समाजातील चांगल्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची या ट्रस्टवर निवड करण्यात यावी. यात काही न्यायमूर्ती तसेच आय.ए.एस अधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात यावी. यात अजून एक पळवाट अशी आहे की, चॅरिटी कमिशनरकडे आज याबाबत सुनावणी होणार आहे.

यावेळी त्यांनी पुन्हा पहिल्यासारखं राजकीय दबावात काम करत वेगळा निकाल दिला तर ही 230 कोटी रुपयांची रक्कम पुन्हा एकदा बिल्डरला देण्याचा घाट घातला जाईल, असा अंदाज वर्तवत. हे 230 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम आहे की यात पुण्यात शिकणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी दहा हजार मुलामुलींची रहिवासी क्षमता असलेले असलेले चांगले वस्तीगृह होऊ शकते, असंही धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com