Aditya Thackeray sarkarnma
मुंबई

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा महालक्ष्मी रेसकोर्सप्रकरणी गंभीर आरोप, पण नेमके प्रकरण काय?

Mahalaxmi Racecourse : मोकळ्या जागेत एकही वीट रचू न देण्याचा ठाकरेंचा इशारा

Roshan More

Mumbai : शिवसेना (उबाठा) नेता आदित्य ठाकरे यांनी महालक्ष्मी परिसरातील रेसकोर्सच्या जागेसंदर्भात खळबळजनक दावा केला होता. ठाकरेंच्या या दाव्यानंतर थेट राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकारच्या जवळील बिल्डरकडून महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचे ठाकरे म्हणाले.

1914 मध्ये भाडेतत्त्वावर महालक्ष्मी येथील भूखंड रेसकोर्स व्यवस्थापनाला दिला होता. हा भाडेकरार संपुष्टात आला आहे. या भूखंडाचे नूतनीकरण करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. मात्र, पालिकेने तसे करावे की नाही, याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे या भूखंडाचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे नूतनीकरण न करता हा भूखंड बिल्डरला देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रेसकोर्सच्या जागेसंदर्भात 6 डिसेंबरला बैठक घेण्यात आली. या बैठकीत आरडब्लूआयटीसी व्यवस्थापनाचे चार जण आणि चार अधिकार्‍यांसह महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्तही उपस्थित होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 226 एकर खुल्या जागेची आभासी विक्री आणि जमीन बळकावण्यास सहमती दर्शविली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरकारच्या या जमीन हडप प्रस्तावाची माहिती अधिकाऱ्यांना होती का? असा प्रश्न आदित्य यांनी उपस्थित करीत मुंबईच्या या मोकळ्या जागेवर आम्ही त्यांना एक वीटही रचू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT