जुई जाधव
Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची आपल्या मेळाव्याची तारीख जाहीर केल्यानंतर ठाकरे गटानेही कंबर कसली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी निवडणुकीसाठी आता ॲक्शन मोडवर आले आहेत. आदित्य ठाकरे येत्या 9 आणि 10 तारखेला कोल्हापूर दौरा करणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे हे सतत दौरे करीत असून नागरिकांशी आणि जनतेशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत.
शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सभा, दौरे, बैठकांचं सत्र सुरु होतं. प्रत्येक मतदार संघात, जिल्ह्यात आणि ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांच्या मतदार संघात त्यांनी सभा घेतला. तिथे जाऊन त्या स्थानिक आमदारांच्या विरोधात भाषण केली आणि कशी गद्दारी केली हे सांगण्याचा प्रयत्न केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराला आणि नेत्यांना जबाबदारी देण्यात आली होती की जाऊन विविध ठिकाणी सभा घ्यायच्या आणि जास्तीत जास्त नागरिकांशी संवाद साधायचा. या सगळ्यात आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले. कोकणात देखील आदित्य ठाकरे यांनी अनेक दौरे आणि सभा घेतल्या.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट जोरदार तयारीला लागला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जरी प्रत्यक्ष मैदानात उतरत नसतील तरी ते बैठका घेत आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेत आहेत. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार देऊ शकतो आणि कोण निवडून येईल यासाठी रणनीती सुरु केली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे सरकार आणि भाजपाच्या विरोधात लढा द्यायचा आहे हा मुख्य उद्देश शिवसेनेच्या समोर आहे. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे.
शिवसेना सध्या सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे. विशेष करून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ते ही नवीन पद्धत वापरत आहेत. मुंबईच्या बाबतीतची काही गोष्ट असेल ती सोशल मीडियावर पोस्ट केली जाते आणि जनतेला जागरूक केलं जातं. यामुळे जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.