Naresh Mhaske, aditya thackeray
Naresh Mhaske, aditya thackeray sarkarnama
मुंबई

Naresh Mhaske :..राजकुमार आता घराबाहेर पडले ! ; म्हस्केंचा आदित्य ठाकरेंना टोला

सरकारनामा ब्युरो

Naresh Mhaske : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे गुरुवारी नाशिक आणि पुण्याच्या दौऱ्यावर होते.नाशिकमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. तर पुण्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याची शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खिल्ली उडवली आहे. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.

नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंवर कवितेतून बोचरी टीका केली. म्हस्केंच्या या कवितेची समाजमाध्यमांवर चर्चा सुरु आहे. ‘राजकुमार आता घराबाहेर पडले’ अशा शब्दात म्हस्केंनी आदित्य ठाकरेंना टोला हाणला आहे.

"वांद्रेतील माणूस बांधावर कधी जातो आणि बांधावरुन पुन्हा वांद्रेत कधी परत येतो, हे कळत नाही. हे लक्झरीअर दौरे आहेत, ज्यावेळी तुमच्या हातात सत्ता होती, तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं,तुम्ही घराबाहेर पडलात का,? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

नरेश म्हस्के आपल्या कवितेत म्हणतात..

असे कसे बरे दादा नवलपरी घडले

राजकुमार आता घराबाहेर पडले

अर्ध्या तासात शेतकऱ्यांची दैना पाहून झाली

नाईट लाईफसाठी स्वारी सातच्या आत परतली घरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT