MNS : बेडका सारख्या उड्या कोण मारतं ? ; राज ठाकरेंना सरडा म्हणणाऱ्या पेडणेकरांवर हल्लाबोल

MNS : "किशोरीताई तुमच्या पक्षाने तर २००९ पासून बेडक्या सारख्या उड्या मारल्या,"
raj thackeray, kishori pednekar
raj thackeray, kishori pednekarsarkarnama

MNS : ठाकरे गटाच्या नेत्या, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नुकतेच टीकास्त्र सोडलं आहे. सरडाही लाजेल एवढी भूमिका राज ठाकरेंनी बदलली असल्याची टीका त्यांनी केली. (raj thackeray latest news)

पेडणेकरांच्या या टीकेला मनसेनं सडेतोड उत्तर दिले आहे. मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी पुण्यात माध्यमांसमोर पेडणेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. "किशोरीताई तुमच्या पक्षाने तर २००९ पासून बेडक्या सारख्या उड्या मारल्या," अशा शब्दात योगेश खैरे यांनी पेडणेकरांना डिवचलं आहे.

"कधी भाजप बरोबर युती तर कधी त्यांना सोडता तर कधी राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसता, त्यामुळे बेडक्या सारख्या उड्या कोण मारतं सगळ्यांना माहिती आहे," असे योगेश खैरे म्हणाले. "राज ठाकरे यांच्यामध्ये दम होता म्हणून ते शिवसेनेतू बाहेर पडले. त्यांनी मनसे स्थापन करून स्वतःच अस्तित्व निर्माण केलं," असे खैरे म्हणाले.

raj thackeray, kishori pednekar
Deepali Sayed कुठल्या पक्षात जाणार ? ; रांगोळीतून दिला वेगळाच संकेत

"भोंगे वाजवू नये म्हणून यांनी आंदोलन केले. आता स्वतःच भोंगे वाजवले. लोकांना इतकं गृहीत धरायला लागलेत. पण लोकांनी तुम्हाला गृहीतच धरलंय. त्या पक्षाचं नाव काय यापेक्षा इमेज काय आहे हे त्यांनाही माहितेय, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे.

"सरड्याला लाजवेल अशा भूमिका राज ठाकरेंच्या आहेत. लोकांनी मनसेला गृहीत धरलं आहे. सी ग्रेड मधून आलेले A ग्रेड पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत," अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. यानंतर आता मनसे -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील वादाला नवीन तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com