Neelam Gorhe, Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray News : 'यह मोह मोह के धागे..' म्हणत आदित्य ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंना टोला

Aditya Thackeray On Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांना काय-काय दिले याची यादीही आदित्य यांनी वाचली

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray Vs Neelam Gorhe : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला शुक्रवारी (ता. ७) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषेदेवरील आमदार नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. माध्यमात पक्षाची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून नीलम गोऱ्हे या परिचित होत्या. विधान परिषेदेवरील आमदार मनिषा कायंदे यांच्यानंतर नीलम गोऱ्हे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Political News)

नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा हा निर्णयावर अनेकांना विश्वास बसत नाही. गोऱ्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेश हा खुर्चीचा मोहातून झाल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. तसेच गोऱ्हे यांना शिवसेनेच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबाने काय-काय दिले याचाही उल्लेख केला आहे.

ट्विटमध्ये आदित्य ठाकरे काय म्हणाले ?

नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून शिंदे गटासह गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सध्या सुरू असलेली लढाई स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी आहे. एकाच व्यक्तीला चार वेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी दिली. २१ वर्षे तिथे असूनही, दोन वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही दिला."

आदित्य यांनी नीलम गोऱ्हे यांना खुर्चीचा मोह आवरता आला नसल्याचा टोलाही यावेळी लगावला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आता झालेल्या पक्षांतरावर एकच गाणं आठवते. 'यह मोह मोह के धागे...' खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!"

गोऱ्हे यांची शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळख

नीलम गोऱ्हे यांनी १९९८ साली शिवसेना पक्षात प्रवेश घेतला, तेव्हापासून त्यांची निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. नीलम गोऱ्हे यांची ओळख फक्त विधान परिषदेवरील आमदार नाही. त्या अनेक वर्ष विधान परिषद सभागृहात उपसभापती म्हणून काम करत आहेत. अनेक वर्ष त्यांनी माध्यमात शिवसेनेची खंबीरपणे बाजू मांडली.

पक्षांतरानंतर गोऱ्हे काय म्हणाल्या ?

शिंदे गटात प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात मोठी विकासकामे झाले आहेत. राम मंदिराचे काम, जम्मू कश्मीर मधील कलम ३०७, ट्रिपल तलाख यासह अजून अनेक कामे मार्गी लागले आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गावर आहे. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा महत्वाचा उद्देश ठेऊनच मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे".

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT