Praful Patel On NCP Crisis : '' जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत का ? म्हणून...'' ; पटेलांचा दावा पवार गटाला अडचणीत आणणार ?

Praful Patel Press Conference : ''...तोपर्यंत कोणतीही कारवाई लागू होणार नाही!''
Praful Patel
Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांच्या निलंबनाचं निलंबन करण्यात आलं आहे. दोन खासदारांमध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीने एकूण ८ ठराव मंजूर केले आहेत. पण आता अजित पवार गटाचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेलांनी काही धक्कादायक खुलासे करतानाच पवार गटाकडून करण्यात आलेल्या निलंबनासह जयंत पाटलांबाबत मोठं विधान केलं आहे.

अजित पवार गटाची शुक्रवारी (दि.७) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रफुल्ल पटेलां(Praful Patel) नी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य करण्यात आलं. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ आदी उपस्थित होते. पटेल म्हणाले, जयंत पाटील यांनी अजित पवार(Ajit Pawar) आणि इतर नऊ जणांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. पण ते आमचे अध्यक्ष आहेत का? म्हणून आमचं म्हणणं सरळसरळ आहे. हे कायद्याच्या कक्षेत बसतच नाही. एकाही आमदाराला अपात्रतेची कारवाई लागू होत नाही.

Praful Patel
Praful Patel Press Conference : राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीत नियमांची पायमल्ली ; प्रफुल्ल पटेलांनी वाढवलं पवारांचं टेन्शन

माझी नियुक्तीच चुकीची आहे तर मला अधिकारच नाही. आमचा ढाचाच चुकीचा आहे. आमची घटना ही अंतिम आहे. कालची बैठक आणि त्यातले घेतलेले निर्णय हे कुणावरही लागू होत नाहीत. कोणी कुणाला काढू शकत नाहीत. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला आधी निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे हा विषय जाईल. त्यांना याबाबत निर्णय घ्यावा लागेल. तोपर्यंत कोणतीही कारवाई लागू होणार नाही असंही पटेल म्हणाले.

आम्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(NCP) आहोत म्हणून चिन्ह आणि इतर गोष्टी आम्हाला थेट मिळायला पाहिजेत, असं आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. हे स्प्लिट नाही किंवा वेगळा गट नाही. सरळसरळ पक्षाचं बहुमत अजित पवार यांच्या पाठीमागे उभी आहे असं आम्ही निवडणूक आयोगाकडे याचिकाद्वारे सांगितलं आहे.

Praful Patel
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : आढळराव शरद पवारांच्या संपर्कात? पण त्या दरवाजाच्या चाव्या माझ्याकडेच; कोल्हेंचा खळबळजनक दावा

काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. मी त्याला दुसरं काही नाव देणार नाही. ती बैठक पक्षाची अधिकृत बैठक नव्हती. आमच्यावर पक्षाचं बंधन आहे. आमच्या पक्षाच्या संविधानाचे नियम आहेत. आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. तसेच आम्ही ३० जूनलाच बहुतांश आमदारांचे प्रतिज्ञापत्रांसह निवडणूक आयोगाला आमची याचिका अजित पवार यांच्या नावाने दाखल केली आहे. ३० तारखेपासून हा विषय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या पटलावर पोहोचला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com