Amit Thackeray, Aditya Thackeray  Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Thackeray : वरळी विधानसभा मतदारसंघात होणार हायव्होल्टेज लढत?

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आली असल्याने राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसापासून एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे महायुतीकडून जागावाटपाची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वत्र निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळणार आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघात सध्या ठाकरे विरुद्ध ठाकरे आमने-सामने लढत होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मनसे (MNS) नेते अमित ठाकरे टक्कर देणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे. (Thackeray Vs Thackeray News)

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी A+ संकल्पनेला मनसेकडून वरळी व्हिजनने उत्तर दिले जात आहे. त्यामुळे या चर्चेला दुजोरा मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित होणाऱ्या वरळी व्हिजन कार्यक्रमाला शिवसेना आणि भाजपचा पाठिंबा आहे. त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघाची ब्लू प्रिंट म्हणजेच वरळी व्हिजन शनिवारी वरळी जांबोरी मैदानात मांडणार आहेत. त्यामुळे नेमके या ब्लू प्रिंटमध्ये आहे तरी काय याची उत्सुकता वरळीतील नागरिकांना लागली आहे. त्यामुळे आता वरळीच्या विकासाचे व्हिजन काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

दरम्यान, वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून कोण मैदानात उतरणार याची चर्चा सुरू झाली आहे. संदीप देशपांडेंच्या नावाची चर्चा असली तरी त्यांचं नाव पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही. तर मागील काही काळापासून मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनीही वरळी मतदारसंघात लक्ष घातले आहे. त्यामुळे वरळीमधून अमित ठाकरे विधानसभा लढणार का अशीही चर्चा सुरू झाली आहे. वरळीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

वरळी मतदारसंघात जशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे. त्याच प्रमाणे मनसेचीही ताकद आहे. जर आदित्य ठाकरेंसमोर अमित ठाकरेंचं आव्हान असेल तर आदित्य यांच्यासाठी वरळीचा गड नक्कीच सोपी नसणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT