Supriya Sule : 'जय श्रीराम'च्या घोषणा अन् सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी उत्तर देऊ शकते, पण..."

Jai Shriram slogans by BJP workers during Supriya Sule speech at a program in Pune : पुण्यातील विविध भूमिपुजनाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिय सुळे भाषणासाठी उभ्या राहताच, भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहर परिसरातील विविध योजनांच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम आज झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान खासदार सुप्रिया सुळे भाषणाला उभे राहताच भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात 'जय श्रीराम', अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्याला सुप्रिया सुळेंनी देखील आपल्या शेलक्या शब्दात उत्तर दिलं.

पुणे (Pune) शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत दिवेघाट ते हडपसरचे चौपदरीकरण, मुळा-मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम आणि सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंत सेवा रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी झाला. सुप्रिया सुळे भाषणासाठी उभे राहायला, त्यावेळी कार्यक्रम स्थळी 'जय श्रीराम', अशी एकच घोषणाबाजी सुरू झाली. याशिवाय 'देवेंद्रजी, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', अशा घोषणा देण्यात आल्या.

यानंतर सुप्रिया सुळे यांनी भाषणाला सुरवात केली आणि म्हणल्या, 'तुमचं झालं असेल, तर मी भाषणाला सुरवात करते'. तरीच देखील कार्यकर्यांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नितीन गडकरींनी देखील कार्यकर्त्यांना थांबा, अशी विनंती केली. मात्र घोषणाबाजी सुरूच राहिली. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील स्टेजवर उभं राहून कार्यकर्त्यांना शांत बसण्यास सांगितलं. त्यानंतर कार्यकर्ते काही प्रमाणात शांत झाले.

दरम्यानच्या काळामध्ये दुसऱ्या बाजूने सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ देखील घोषणाबाजी करण्यास कार्यकर्त्यांनी सुरवात केली. मात्र सुप्रिया सुळे यांनी तातडीने कार्यकर्त्यांना थांबण्याचा इशारा केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आपण पक्षासाठी आलेलो नाहीत, तर गडकरीसाहेबांचे आभार मानण्यासाठी आलो आहे. मी उत्तर देऊ शकते. पण देणार नाही".

विधानसभा निवडणुकीची नांदी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सरकारी कामाच्या उद्घाटनाला जाणून-बुजून स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलवणं टाळण्यात येतं असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे निमंत्रण सुप्रिया सुळे यांना देण्यात आलं होतं आणि सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती देखील लावली. त्यानंतर अशा प्रकारची घोषणाबाजीचा प्रकार घडल्यामुळे ही आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com