BMC budget 2025 and Aditya Thackeray : मुंबई महानगरपालिकेने आज सादर केलेला अर्थसंकल्प पाहिल्यास मुंबईची स्थिती वर्णन करण्यासाठी ही शायरी अगदी चपखल वाटते; "हजार गम है, खुलासा कौन करे; अब तो मुस्कुरा लेता हूं, तमाशा कौन करे।" असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बीएमसी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत निशाणाही साधला आहे.
आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी आपल्या एक्सवर म्हटले आहे की, ''आजच्या अर्थसंकल्पात अदानीसाठी स्लममधील छोट्या दुकानदारांवर प्रॉपटी टॅक्स लावला गेलाय. हे कशासाठी? तसेच, धारावीमधून साडेसात हजार कोटींचा प्रीमियम बीएमसीला येणे आवश्यक आहे, ह्याचा उल्लेख अर्थसंकल्पात नाही. हे धोकादायक आहे,अदानी आपली जमीन, कर ढापायला लागले आणि प्रीमियम न भरता जमीन घ्यायला लागले तर मुंबईत अदानींना कोण रोखणार? भाजप स्वतःच्या मालकाला रोखू शकेल का? असा खोचक सवालही आदित्य ठाकरेंनी केला आहे.
याशिवाय 'महापालिका आता घनकचऱ्यासाठी मुंबईकरांवर कर लावणार आहे आणि त्या पैशातून धारावी, देवनारची जागा स्वच्छ करून अदानीच्या हातात देणार आहे. गेल्या दोन वर्षात मिंधेंनी जी कॉन्ट्रॅक्टर मित्रांची सेवा केली त्यामुळे २.५ लाख कोटींचा बोजा एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांवर टाकला आहे.' अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेचा 2025-206 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंगळवारी(ता.4) सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरानी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण घोषणांसह एकूण तब्बल 74 हजार 427.41 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात (budget) विक्रमी वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या बजेटमध्ये तब्बल साडे पंधरा हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण रा्ज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. त्याचमुळे मुंबई-पुणे यांसह राज्यातील गेल्याकाही वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे यंदाच्या मुंबई महापालिकेच्या (BMC Budget 2025) अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांसाठी सर्वांचंच डोळे लागलेले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.