BMC Budget 2025 : 'बीएमसी'चा मुंबईकरांना मोठा दिलासा, करवाढीचं संकट टळलं; 74 हजार 427 कोटींचा अर्थसंकल्प सादर,'या' नव्या योजनांचा समावेश

Mumbai Municipal Budget News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात विक्रमी वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या बजेटमध्ये तब्बल साडे पंधरा हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे.
Bmc News
Bmc NewsSrakarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण रा्ज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. त्याचमुळे मुंबई-पुणे यांसह राज्यातील गेल्याकाही वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे यंदाच्या मुंबई महापालिकेच्या (BMC Budget 2025) अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांसाठी सर्वांचंच डोळे लागलेले होते.

मुंबई महापालिकेचा 2025-206 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंगळवारी(ता.4) सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरानी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण घोषणांसह एकूण तब्बल 74 हजार 427.41 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात (budget) विक्रमी वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या बजेटमध्ये तब्बल साडे पंधरा हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे.

Bmc News
BJP News : भाजपाचा संभाजीनगरमध्ये 'डबल गेम'; एकीकडे महायुतीची भाषा, तर दुसरीकडे स्वबळाची चाचपणी!

गेल्या वर्षीच्या 59 हजार कोटी वरुन यंदाचं बजेट 74 हजार कोटींवर आलं आहे. आरोग्य,शिक्षण,बेस्ट,कोस्टल रोड प्रकल्प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड 32 हजार 782 PAP सदनिकांच्या प्रस्तावांना मंजुरी अशा अनेक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या या बजेटमध्ये मुंबईतील पर्यटनवाढीवर भर देण्यात आला आहे.यासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात पेंग्विन,जॅग्वार,झेब्रा,जिराफ यांसारख्या विदेशी प्रजातींच्या प्राण्यांना राणीच्या बागेतील आणण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे.

Bmc News
Anjali Damania on Dhananjay Munde : 'शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारला, त्यांना मंत्रिपदावर ठेवण्याची काय गरज?' ; दमानिया यांचा मुंडेंवर पुराव्यानिशी आरोप

मुंबई शहरातील आरोग्यसंबंधी सोयीसुविधांसाठी 7 हजार कोटी,शिक्षणासाठी 4 हजार कोटींची तरतूद, सार्वजनिक वाहुतकीचा कणा असलेल्या बेस्टसाठी 2025-26 मध्ये 1000 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.याचवेळी दहिसर ते भाईंदरकोस्टल रोड प्रकल्पाकरिता 2025 26 चा अर्थसंकल्पात 4300 कोटी,गोरेगाव मुलुंड लिंक रोडकरिता 1958 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

कोळीवाड्यांच्या विकासासाठीही प्राधान्य देताना महापालिकेनं 25 कोटींचे अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा केली आहे. लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आयची उभारणी, मुंबई महानगरपालिकेच्या शंभर शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑरगॅनिक फार्मिंग किचन गार्डन पद्धत राबवली जाणार असून त्याद्वारे शेतीविषयक माहिती मिळणार आहे.

Bmc News
Vaibhav Naik : कोकणात ठाकरे गटाला एसीबीचे हादरे; वैभव नाईक अन् स्नेहा नाईक यांना नोटीस

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्प सादर करतेवेळी महापालिकेच्या महसूलातील 7 हजार 410 कोटींची वाढ झाली असल्याची माहिती दिली. कचरा संकलनाबाबत पालिकेने सध्याजरी कोणताही कर लागू केला जाणार नसल्याचं स्पष्ट केले असले तरी याविषयी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याचं अर्थसंकल्पात नमूद केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com