Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : अजित पवारांनंतर आता जयंत पाटलांना डेंग्यूची लागण ; ट्विट करत दिली माहिती

NCP Politics : राज्यात काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूने गाठले होते.

Deepak Kulkarni

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. नुकतेच ते डेंग्यूच्या आजारातून बाहेर पडले आहेत.मात्र, याचवेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना डेग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.

माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विटरवरून डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली आहे. पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूने गाठले होते. त्यामुळे त्यांना सक्त विश्रांती घ्यावी लागली होती. पण डेंग्यू बरा झाल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.तसेच अजित पवार गटात निधीवाटपावरुन नाराज असल्याची देखील बोलले जात आहे.

...यानंतरच जागावाटपास वेग येईल!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार(Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपावर भाष्य केले होते. ते म्हणाले,देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेससह विरोधकांच्या इंडिया आघाडीस अनुकूल वातावरण असल्याचे निवडणूकपूर्व कल चाचण्यांत दिसत आहे. तथापि,त्या राज्यांच्या निकालानंतर लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपास वेग येईल, असा दावाही त्यांनी केला.

तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षातील खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थक आमदारांना निधीवाटपात अन्याय होत असल्याचा आरोप होत असला तरी, आमदारांना निधीवाटप हा सरकारचा अंतर्गत विषय आहे. राज्य शासनात वित्त व नियोजन विभागाचा कार्यभार अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या गटातील आमदारांवर निधीवाटपात अन्याय होत असेल असे मुळीच वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

प्रत्येक आमदाराला आपआपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी हवा असतो. बदलत्या काळात आज चुकीच्या प्रथा, परंपरा व पायंडे पडत आहेत, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT