Maharashtra Politics : रामदास कदमांनी उरल्यासुरल्या राजकारणाची चव घालवली अन् स्वतःची शोभा करून घेतली...

Ramdas Kadam Vs Gajanan Kirtikar : रामदास कदम यांनी आज महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेचे धिंडवडे काढले.
Ramdas Kadam-Gajanan Kirtikar
Ramdas Kadam-Gajanan Kirtikar Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Political News : बेताल बडबड करणारे नेते अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी (ता. १४ नोव्हेंबर) सर्व मर्यादा ओलांडत हीन भाषेची नीचांकी पातळी गाठली. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर आणि कदम यांच्यात वाद सुरू झाला आहे. तो वाद संपुष्टात येईल, अशी चिन्हे दिसत असतानाचा कदम यांनी आज महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेचे धिंडवडे काढले. त्यांनी कीर्तिकर यांच्या खासगी जीवनावर टीकाटिप्पणी करून आपल्या बालिशपणाचा परिचय तर दिलाच, शिवाय महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावली. (Ramdas Kadam criticizes MP Gajanan Kirtikar's personal life)

राजकीय नेत्यांमध्ये मतभेद असतात, स्पर्धा असते, सत्तेचा हव्यास असतो. त्यातून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जाते. मात्र, त्याला एक मर्यादा असते. भाषेची पातळी असते. रामदास कदम यांनी मात्र हे सर्व गुंडाळून ठेवत कीर्तिकर यांच्या अत्यंत खासगी अशा मुद्द्यावर किळसवाणी टिप्पणी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी हीन स्वरूपाची टीका जाहीरपणे आतापर्यंत कुणीही केली नसेल. पानटपरीसमोर उभे राहून बोलले जाते, तसा प्रकार कदम यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramdas Kadam-Gajanan Kirtikar
Solapur Politics : मोहिते पाटलांनी वाढवले भाजपचे टेन्शन; माढ्यातून लोकसभा लढविण्याची केली घोषणा

रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यात मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून वाद निर्माण झाला आहे. कीर्तिकर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता ती जागा कदम यांना आपल्या मुलासाठी हवी आहे. त्यावरून कीर्तिकर यांनी पत्रक काढून कदम यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास मोठा आहे, असे ते म्हणाले होते. त्यावर कदम यांनीही कीर्तिकर यांच्यावर टीकेची झोड उठवत तेच गद्दार आहेत, असे म्हटले होते.

हे प्रकरण येथेच थांबेल, असे वाटत असतानाच कदम हे मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कीर्तिकरांना उद्देशून म्हणाले, की तुम्ही तुमच्या पत्नीशी गद्दारी केली. पुण्याला शेण खायला जाता का? महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात किमान अलीकडच्या काळात तरी एखाद्या नेत्याच्या खासगी आयुष्यावर अशी प्रकारची टीका पहिल्यांदाच झाली असावी. सुसंस्कृत महाराष्ट्राला रामदास कदम यांच्या या चिखलफेकीने शरमेने मान खाली घालायला लावली आहे.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर राजकीय पक्ष, नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप, टीकेचे स्वरूप बदलत गेले. एकमेकांवर किळसवाणी टीका केली जाऊ लागली. त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले रामदास कदम आघाडीवर होते. ठाकरे कुटुंबीयांवर, आपल्या विरोधकांवर त्यांनी मर्यादा सोडून टीका केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळीच सावध व्हायला हवे होते. रामदास कदम यांच्यासारख्या वाचाळांना आवर घालायला हवा होता. कदम हे विरोधकांवर टीका करत होते म्हणून त्यांच्या पक्षातील नेते कदाचित शांत बसले असतील. आता कदमांचा भस्मासुर झाला आहे. तो त्यांच्याच पक्षावर उलटला आहे.

Ramdas Kadam-Gajanan Kirtikar
Wadettiwar Vs Mitkari : विजय वडेट्टीवार हे तेव्हाच भाजपमध्ये जाणार होते...: अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

राज्यातील जनता २०१९ पासून अशा राजकीय नेत्यांना सहन करत आहे. आता मात्र या सहनशीलतेचाही कडेलोट झाला आहे. राजकारणात आपले भविष्य सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात रामदास कदम यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर मोठा डागच लावून घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर या दोन नेत्यांमधील वादाने संकट निर्माण झाले आहे.

Ramdas Kadam-Gajanan Kirtikar
ShahajiBapu Patil News : शहाजीबापूंनी पुन्हा दंड थोपटले; ‘मला २०२४ मध्ये कोणाचेही आव्हान नाही’

पवार कुटुंबीयांकडून शिका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली, अजित पवार बाहेर पडले. मात्र, पवार कुटुंबीयांनी, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी सुसंस्कृतपणाची मर्यादा ओलांडली नाही. त्यांच्या भाषेची पातळी कधीही घसरली नाही. फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांनी एकमेकांवर टीका केली. आरोप-प्रत्यारोप केले. मात्र, भाषेची मर्यादा कधीच सोडली नाही. पवार कुटुंबीय एकमेकांप्रती अद्यापही आदर दाखवतात. राजकारण वेगळे, कुटुंब वेगळे हे तत्त्व त्यांनी जपले आहे. तसे ते जाहीरपणे बोलूनही दाखवतात. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी गेले वर्षभर काय केले, हे एकदा तपासून पाहिले पाहिजे आणि पवार कुटुंबीय, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांपासून बरेच काही शिकून घेतले पाहिजे.

Ramdas Kadam-Gajanan Kirtikar
Supriya Sule News : सुप्रिया सुळे भाऊबीजेला काटेवाडीत अजित पवारांच्या घरी जाणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com