Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : फडणवीस म्हणतात ‘आम्ही पुन्हा येऊ...!’

जनतेने आम्हाला थोडे कमी आशीर्वाद दिले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : संपूर्ण ताकद पणाला लावूनही भारतीय जनता पक्षाला (BJP) कसब्याच्या पोटनिवडणुकीत (By Election) पराभव पत्कारावा लागला आहे. तब्बल २८ वर्षांनंतर कसबा हातातून निसटल्यानंतर भाजपच्या गोटात निराशा पसरली असली तरी चिंचवडच्या विजयाने ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती भाजप नेत्यांची आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’ अशा आशावाद जागवला आहे. (After defeat in Kasba by-election, Fadnavis says we will come again)

कसब्यातील पराभवानंतर फडणवीस म्हणाले की, कसब्यातील जनतेचे मनापासून आभार मानतो. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!

कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव झाला, त्यामुळे भाजपला आपला गड अनेक वर्षांनंतर गमावावा लागला. पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप व शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी पुण्यात तळ ठोकला होता. मात्र, धंगेकरांच्या लोकप्रियतेपुढे त्यांची मात्रा चालू शकलेली नाही, त्यातूनच भाजपला आपला हक्काचा मतदारसंघ गमावावा लागला.

दुसरीकडे, शेजारच्या चिंचवड मतदारसंघात मात्र भाजपच्या अश्विनी जगताप यांनी विजय खेचून आणला आहे. त्या ठिकाणाचे राष्ट्रवादीचे आव्हान मोडीत काढण्यात जगताप या यशस्वी ठरल्या आहेत. त्याबाबत फडणवीस म्हणाले की, चिंचवड विधानसभा क्षेत्रातून आमच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासियांचे मनापासून आभार! (स्व.) लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही भावपूर्ण आदरांजली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT