Mumbai-Pune Highway 
मुंबई

Mumbai-Pune: एक्स्प्रेसवे अन् मिसिंग लिंकनंतर मुंबई-पुणे प्रवास आता आणखी वेगवान अन् ट्राफिकमुक्त होणार; MSRDCनं घेतला मोठा निर्णय

Mumbai-Pune: देशातला पहिला एक्स्प्रेस वे अर्थात यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार होऊन बरीच वर्षे झाली तरी या दोन शहरांदरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणावरील वाहतुक कोंडीमुळं त्रासदायक ठरतो आहे.

Amit Ujagare

Mumbai-Pune Highway : देशातला पहिला एक्स्प्रेस वे अर्थात यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार होऊन बरीच वर्षे झाली तरी या दोन शहरांदरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणावरील वाहतुक कोंडीमुळं त्रासदायक ठरतो आहे. प्रामुख्यानं लोणावळा-खंडाळा घाटामध्ये होणारी ही वाहतुक कोंडी फोडण्यासाठी मिसिंग लिंकचा नवा रस्ताही गेल्यावर्षी खुला झाला. पण मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि ट्राफिकमुख्त करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC नं मोठं पाऊल उचललं आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा सहापदरी रस्ता आहे, त्यानंतर आता जुना-मुंबई पुणे महामार्गाच देखील सहापदरीकरणं करण्याचा निर्णय MSRDCनं घेतला आहे. वाहत्या वाहतुक कोंडीवर मात करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. निगडी ते शिळफाटा दरम्यानच्या १११ किमीच्या रस्त्याचं आता सहापदरीकरण होणार आहे. यासाठी MSRDCकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया देखील सुरु केली आहे.

दरम्यान, या प्रकल्पासाठी ५ ते ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण हा रस्ता झाल्यास या दोन शहरांमधील प्रवास हा अधिक वेगवान आणि सुखकर होईल. सध्या या रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे प्रतिदिन ७० हजार वाहनांची वाहतूक सुरु असते. या रस्त्याला ५ ते ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळं टोलचा कालावधी १० ते १५ वर्षांनी वाढण्याची शक्यता आहे.

दररोज अथवा अधुनमधून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी याचा अत्यंत फायदा होणार आहे. दोन्ही रस्त्यांपैकी कुठलाही रस्ता जर कोणत्याही कारणामुळं ठप्प झाला असेल तर त्यासाठी पर्यायी चांगला रस्ता उपलब्ध असेल. मुंबईहून पुण्याला अथवा पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी सहापदरी असे दोन महामार्ग उपलब्ध असतील. त्याचबरोबर याचा सर्वात जास्त फायदा हा लोणावळा शहराला होऊ शकतो. कारण याच ठिकाणी जुना मुंबई-पुणे रस्ता हा घाटरस्ता असल्यामुळं आणि तो लोणावळा शहरातून जात असल्यानं अत्यंत निमुळता होतो जर या ठिकाणी रस्ता अधिक रुंद झाला तर लोणावळा शहराच्या विकासाला देखील चालना मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT