Kapil Patil Sarkarnama
मुंबई

Kapil Patil News : नितीशकुमारांची साथ सोडल्यानंतर कपिल पाटलांचा आता 'हा' नवा पक्ष

Samajwadi Gan Rajya Party : नितीशकुमार एनडीएत गेल्यानंतर नाराज कपील पाटलांचा पक्ष इंडियासोबतच राहणार

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : जनता दल (संयुक्त)चे प्रमुख नितीशकुमारांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करणाऱ्या आमदार कपील पाटील यांनी पक्षाच्या महासचिवपदाचा राजीनामा दिला. नितीशकुमारांची साथ सोडल्यानंतर आता कपील पाटलांनी त्यांच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आहे. समाजवादी गणराज्य पार्टी असे पाटलांच्या नव्या पक्षाचे नाव असून ते उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. (Kapil Patil News)

नितीशकुमारांनी इंडिया आघाडीसाठी (INDIA Alliance) देश पिंजून काढत विरोधकांची मोट बांधली होती. त्यामुळे तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत अशी एकहाती जोर कपिल पाटलांनी लावला होता. मात्र नितीशकुमारांनीच पलटी मारत एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नितीशकुमारांवर इंडिया आघाडीसह जेडीयुतील बडे नेतेही नाराज झाले. यात कपील पाटील अग्रस्थानी होते. त्यांनी थेट पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदाचा राजीनामा देत आपण आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नितीशकुमारांना (Nitishkumar) रामराम केल्यानंतर कपिल पाटलांनी रविवारी (ता. ३) आपल्या समाजवादी गणराज्य पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली. तसेच आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ऐन लोकसभेच्या तोंडावर पाटलांनी सोडलेली साथ नितीशकुमारांसाठी धक्कादायक मानली जात आहे.

दरम्यान, समाजवादी गणराज्य पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार देणार का? याचीच चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेला नाहीतर विधानसभा निवडणुकीत कपिल पाटील (Kapil Patil) किमान 5-6 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाटलांची भूमिका आगामी काळात स्पष्ट होईल, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

कोण आहेत कपिल पाटील ?

जनता दल संयुक्त पक्षाचे (JDU) महाराष्ट्राचा चेहरा म्हणून कपिल पाटलांची ओळख आहे. त्यांच्याकडे पक्षाने 2022 मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली होती. पाटील हे सलग तीन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी शिक्षणाचा हक्क आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी विधिमंडळात सातत्याने आवाज उठवला आहे. पत्रकार असलेल्या पाटलांनी लोकभारती संघटना स्थापन केली होती. ती नंतर नितीशकुमारांच्या जेडीयू पक्षात विलीन केली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT